पुणे : मित्रांबरोबर फिरायला आलेल्या तरुणाचा खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू; ताम्हिणी घाटातील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात  फिरायला आलेल्या तरुणाचा प्लस व्हॅली येथील कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहन विरेश लोणी (वय 21, मुळचा सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी माहिती मिळताच तातडीने शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहन विरेश लोणी (वय 21) हा मुळचा सोलापूर येथील … The post पुणे : मित्रांबरोबर फिरायला आलेल्या तरुणाचा खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू; ताम्हिणी घाटातील घटना appeared first on पुढारी.
#image_title

पुणे : मित्रांबरोबर फिरायला आलेल्या तरुणाचा खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू; ताम्हिणी घाटातील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात  फिरायला आलेल्या तरुणाचा प्लस व्हॅली येथील कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहन विरेश लोणी (वय 21, मुळचा सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी माहिती मिळताच तातडीने शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रोहन विरेश लोणी (वय 21) हा मुळचा सोलापूर येथील आहे. शिक्षणासाठी तो पुण्यात राहत होता. आज मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली येथे फिरायला आला असता, कुंडातील पाण्यात पोहण्यासाठी उतरला. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने रोहनचा बुडून मृत्यू झाला.
प्लस व्हॅलीला जाण्यासाठी बरीच पायपीट आहे. मोठमोठे दगडगोटे, तीव्र उतार अशा ठिकाणी एखाद्या जखमी व्यक्तीला किंवा मृत व्यक्तीला बाहेर काढणे कठीण आहे. दुपारी साडे चार वाजता शिवदुर्ग टीम घटनास्थळी पोचली पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापन संस्था मुळशीचे प्रमोदजी बलकवडे , मानगाव आपत्ती व्यवस्थापनाचे शेलार मामा , पौड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी, वनखात्याचे कर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी समीर इंगळे वनरक्षक अभिनंदन सोनकांबळे ,संतोष नवगिरे, ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक संस्था मावळची टीम या ठिकाणी उपस्थित होते.
The post पुणे : मित्रांबरोबर फिरायला आलेल्या तरुणाचा खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू; ताम्हिणी घाटातील घटना appeared first on पुढारी.

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मित्रांबरोबर ताम्हिणी घाटात  फिरायला आलेल्या तरुणाचा प्लस व्हॅली येथील कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहन विरेश लोणी (वय 21, मुळचा सोलापूर) असे तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी माहिती मिळताच तातडीने शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक संस्था, मावळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहन विरेश लोणी (वय 21) हा मुळचा सोलापूर येथील …

The post पुणे : मित्रांबरोबर फिरायला आलेल्या तरुणाचा खोल दरीतील कुंडात बुडून मृत्यू; ताम्हिणी घाटातील घटना appeared first on पुढारी.

Go to Source