तुमच्या घरातही पदे, त्याचा हिशेब द्या ; कैलास बापू कोते यांची टीका
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : तुमचे जितके वय आहे, त्याहून अधिक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक कार्यातील अनुभव आहे. त्यांच्यावर भाष्य करण्यापूर्वी गणेश कारखान्यातील ऊस उत्पादकांना चांगला भाव देण्याची गॅरंटी द्या, तुमच्याही कुटूंबालाही अनेक पद मिळाली, मग त्याचाही हिशोब आम्ही मागायचा का? असा सवाल माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी विवेक कोल्हे यांना केला आहे. कोपरगाव दौर्यानंतर कोल्हे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या टिकेला कैलास कोते यांनी उत्तर दिले. विखे पाटील यांच्यावर बोलण्या इतके आपले वय नाही. उठसुठ विखे पाटील यांच्यावर टिका केली म्हणजे आपण फार मोठे होवू, असा समज असेल तर तो खोटा ठरवायला वेळ लागणार नाही. राजकारणातले खूप उन्हाळे-पावसाळे अजून पाहायचे आहेत. बगलबच्चांनी खांद्यावर उचलून घेतले म्हणजे मोठी उंची गाठली असे होत नाही.
यासाठी लोकांसाठी काम करावे लागते. तुम्ही आयत्या पीठावरच रेघोट्या मारत असल्याचा टोला कोते यांनी लगावला. विखे कुटूबियांना वर्षानुवर्षे जनतेचे पाठबळ, पदे मिळाली. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम जनतेच्या मनात आहे.
त्यामुळे त्यांनी काय काम केले, हे विचारण्याचा तुमचा अधिकार नसल्याचा टोला कोते यांनी लगावला.
अजूनही विचार करा..!
विखे पाटील यांच्यावर बोलताना वयाचा विचार करा. तुमची बोलण्याची स्क्रीप्ट सध्या कुठुन येते?, हे जनता जाणून आहे. पण ज्यांचे बोट धरून तुम्ही निघाले आहात, ते तुम्हला कुठे सोडून देतील, याचा अजूनही विचार करा असा सल्लाही कोतेंनी दिला.
The post तुमच्या घरातही पदे, त्याचा हिशेब द्या ; कैलास बापू कोते यांची टीका appeared first on पुढारी.
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : तुमचे जितके वय आहे, त्याहून अधिक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक कार्यातील अनुभव आहे. त्यांच्यावर भाष्य करण्यापूर्वी गणेश कारखान्यातील ऊस उत्पादकांना चांगला भाव देण्याची गॅरंटी द्या, तुमच्याही कुटूंबालाही अनेक पद मिळाली, मग त्याचाही हिशोब आम्ही मागायचा का? असा सवाल माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी विवेक कोल्हे यांना …
The post तुमच्या घरातही पदे, त्याचा हिशेब द्या ; कैलास बापू कोते यांची टीका appeared first on पुढारी.