पुढारी ऑनलाईन डेस्क : हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभास स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. (Salaar First Song) २२ डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत आहे. (Salaar First Song)
संबंधित बातम्या –
Rajinikanth : रजनीकांत यांच्या ‘थलाइवर १७०’ या चित्रपटाला मिळालं नवं नाव (video)
Tripti Dimri : इंटिमेंट सीन गाजताच तृप्ती ‘या’ अभिनेत्यासोबत करणार रोमान्स?
Andre Braugher: एमी विजेता स्टार आंद्रे ब्रूघेर काळाच्या पडद्याआड
या चित्रपटाविषयी नुकतेच जाहीर करण्यात आले होते की, त्याचे पहिले गाणे ‘सूरज ही छांव बनके’ हे आज १३ डिसेंबर, २०२३ रोजी रिलीज होणार आहे. आता गाण्याची पार्श्वभूमी आणि चित्रपटाची पार्श्वभूमी मुख्यत्वे मैत्रीच्या पैलूवर आधारित आहे.
प्रशांत नील या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, “सालार भाग एक हे पूर्णपणे वेगळे जग आहे. चित्रपटातील अॅक्शन जबरदस्त आहे आणि त्यात दमदार पात्र आहेत, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोन मित्रांच्या खानसारच्या जगात प्रवास करतानाची ही भावनिक कथा आहे. मला भावना आणि मैत्रीच्या कथेसह अॅक्शन-पॅक्ड ड्रामा चित्रपट बनवायचा होता आणि सालारने मला ती संधी दिली आहे.
आम्हांला सालारच्या खानसार हे मानवांना ज्ञात असलेल्या सर्वात हिंसक जगांपैकी एक बनवायचे होते, परंतु भावनांमध्ये खोलवर रुजलेले जग देखील बनवायचे होते. मला ठाम विश्वास आहे की सालार सारख्या चित्रपटात, पात्रांचा विकास करण्यासाठी हेतू खूप महत्वाचा आहे जेणेकरून ते प्रेक्षकांशी जोडले जातील. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी ही व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे साकारली आहे जिथे तुम्ही दोन मित्रांच्या भावना आणि त्यांचे परस्पर ऑन-स्क्रीन बंध अनुभवू शकता. चित्रपटात, प्रत्येक अॅक्शन सीक्वेन्स भावना घेऊन येतो आणि आम्ही अॅक्शन आणि इमोशनचा परिपूर्ण मिलाफ सादर करण्याचा प्रयत्न केला आहे जो प्रेक्षकांच्या मोठ्या वर्गाला आवडेल.
होम्बले फिल्म्स निर्मित, सालार: भाग १ सीझफायर चित्रपट निर्माते प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे. यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
The post प्रभासच्या ‘सालार’मधील ‘सूरज ही छाव बनाके’ पहिलं गाणं रिलीज appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : हा भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभास स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. (Salaar First Song) २२ डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये हा अॅक्शन-पॅक्ड चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुकतेने वाट पाहत आहे. (Salaar First Song) संबंधित बातम्या – Rajinikanth : रजनीकांत …
The post प्रभासच्या ‘सालार’मधील ‘सूरज ही छाव बनाके’ पहिलं गाणं रिलीज appeared first on पुढारी.