Pune : डाक सेवकांचा बारामतीत ठिय्या

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाक सेवकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत मंगळवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील दीड हजार डाक सेवक सहभागी झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प होणार आहे. ग्रामीण भागातील डाक कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक … The post Pune : डाक सेवकांचा बारामतीत ठिय्या appeared first on पुढारी.
#image_title

Pune : डाक सेवकांचा बारामतीत ठिय्या

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाक सेवकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत मंगळवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील दीड हजार डाक सेवक सहभागी झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प होणार आहे. ग्रामीण भागातील डाक कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने दिला. या संपात बारामती विभागीय पोस्ट कार्यालयासमोर बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, तालुक्यासह जेजुरी, शिक्रापूर, रांजणगाव, तळेगाव येथून डाक सेवक सहभागी झाले आहेत.
संबंधित बातम्या :

Ring Road : 25 टक्केचा लाभ घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस
घर फिरले की घराचे वासेही फिरले ! पवारांच्या वाढदिवसाचा जल्लोष कमीच !
Pune News : वायसीएममधील एचबीओटी मशीन वापराविनाच

विभागीय कर्मचार्‍यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए-डीए, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू करण्यात याव्यात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे काम कमिशनऐवजी वर्कलोडमध्ये सामाविष्ट करण्यात यावे, या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार डाक कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखत पत्र, मनीऑर्डर सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम ठप्प होणार आहे. तसेच पंतप्रधान किसान नमो योजनेचे पैसे शेतकर्‍यांना मिळणार नाहीत. या अगोदरही ग्रामीण डाक सेवकांनी मुंबई व विभागीय कार्यालयावर एक दिवशीय देशव्यापी धरणे आंदोलन, एक दिवशीय लाक्षणिक संप सुरू ठेवला होता.
या वेळी अध्यक्ष महेंद्र राऊत, सचिव बाळासाहेब मोरे, खजिनदार संतोष बंडगर, उपाध्यक्ष दिलीप कुंभार, विनायक ताकवले, ज्ञानेश्वर यादव, कुंडलिक दिवेकर, चंद्रकांत शेलार, अलिशान सय्यद, अमिर काझी, संजय बिचकुले, ज्ञानेश्वर गोसावी, हनुमंत गुरव, सुहास अत्रे, आनंदराव मोहिते, उत्तम खेडेकर, गोरख सवाणे आदी उपस्थित होते.
The post Pune : डाक सेवकांचा बारामतीत ठिय्या appeared first on पुढारी.

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाक सेवकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत मंगळवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात पुणे जिल्ह्यातील दीड हजार डाक सेवक सहभागी झाले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प होणार आहे. ग्रामीण भागातील डाक कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक …

The post Pune : डाक सेवकांचा बारामतीत ठिय्या appeared first on पुढारी.

Go to Source