जुन्नरला आढळले मध्ययुगीन काळातील भांडे

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : मातीचा ढिगारा बाजूला करीत असताना मध्ययुगीन काळातील वैशिष्ट्यपूर्ण भांडे आढळून आले. इतिहास अभ्यासक बापू ताम्हाणे यांनी ही माहिती दिली. याबाबत ताम्हाणे म्हणाले, की जुन्नर हे सातवाहन काळातील वसलेले ऐतिहासिक गाव आहे. मध्ययुगीन कालखंडात जुन्नरच्या बाजारपेठेशी आलेला व्यापार संबंध, तसेच लोकवस्ती स्थळावरील संस्कृती साधनाच्या अवशेषाचे पुरावे नव्याने उजेडात येऊ लागले आहे. … The post जुन्नरला आढळले मध्ययुगीन काळातील भांडे appeared first on पुढारी.
#image_title

जुन्नरला आढळले मध्ययुगीन काळातील भांडे

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : मातीचा ढिगारा बाजूला करीत असताना मध्ययुगीन काळातील वैशिष्ट्यपूर्ण भांडे आढळून आले. इतिहास अभ्यासक बापू ताम्हाणे यांनी ही माहिती दिली. याबाबत ताम्हाणे म्हणाले, की जुन्नर हे सातवाहन काळातील वसलेले ऐतिहासिक गाव आहे. मध्ययुगीन कालखंडात जुन्नरच्या बाजारपेठेशी आलेला व्यापार संबंध, तसेच लोकवस्ती स्थळावरील संस्कृती साधनाच्या अवशेषाचे पुरावे नव्याने उजेडात येऊ लागले आहे. जुन्नरमध्ये आढळलेले भांडे हे नेहमी वापरत असलेल्या मातीच्या भांड्यापेक्षा अधिक टिकाऊ, जड असल्याचे भांड्याच्या जडण-घडणीवरून दिसून येते. त्यास दगडी भांडे (स्टोनवेअर) हे नाव त्याच्या दगडासारख्या गुणावरून मिळालेले असावे.
संबंधित बातम्या :

Ring Road : 25 टक्केचा लाभ घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस
Rohit Pawar : रोहित पवार यांनी केला अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध
Lok Sabha Elections : नाशिकच्या आखा‌ड्यात शिंदे- उबाठा गटांत सामना?

दगडी स्वरूपातील भांडे मजबूत, तसेच छिद्ररहित असून, ते इतर प्रकारच्या मातीच्या भांड्यापेक्षा अधिक समान रीतीने उष्णता वितरित करणारे आहे. तापमान एक समान राखण्यासाठी हे भांडे तयार केले असावे. अशा प्रकारची भांडी मध्ययुगीन कालखंडात अन्न उबदार ठेवण्यासाठी वापरली जात. स्वयंपाकघरातील ठराविक भांड्याप्रमाणे या दगडी भांड्याचा वापर त्या कालखंडात केला जात असावा.
जुन्नरमध्ये आढळलेल्या दगडी स्वरूपातील छिद्ररहित भांड्याचा वापर प्रत्यक्ष चुलीवरील जेवण करण्यासाठी, तसेच द्रव पदार्थ ठेवण्यासाठी केला जात असे. भांड्यात शिजवलेले अन्न फार काळ गरम राहात असून, अन्नाला समान रूपात उष्णता वितरित करीत असल्याने अशा प्रकारची भांडी मध्ययुगीन कालखंडात वापरली जात होती. पिढीजात वतनदार, घरंदाज, तालेवार, प्रतिष्ठित घराणी मातीच्या भाजलेल्या खपरी भांड्यासारखी अधिक टिकाऊ असणारी भांडी वापरत असत.
                                 रणजित रमेश हिर्लेकर, सदस्य कोकण इतिहास परिषद.
 
The post जुन्नरला आढळले मध्ययुगीन काळातील भांडे appeared first on पुढारी.

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : मातीचा ढिगारा बाजूला करीत असताना मध्ययुगीन काळातील वैशिष्ट्यपूर्ण भांडे आढळून आले. इतिहास अभ्यासक बापू ताम्हाणे यांनी ही माहिती दिली. याबाबत ताम्हाणे म्हणाले, की जुन्नर हे सातवाहन काळातील वसलेले ऐतिहासिक गाव आहे. मध्ययुगीन कालखंडात जुन्नरच्या बाजारपेठेशी आलेला व्यापार संबंध, तसेच लोकवस्ती स्थळावरील संस्कृती साधनाच्या अवशेषाचे पुरावे नव्याने उजेडात येऊ लागले आहे. …

The post जुन्नरला आढळले मध्ययुगीन काळातील भांडे appeared first on पुढारी.

Go to Source