कोल्हापूर : सरूड येथील प्रथमेश केसरेची क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड
सरूड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील श्री शिव -शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश केसरे याची राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. सद्या तो येथे विज्ञान शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथमेश केसरे याने दुसरे स्थान मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत तो कोल्हापूर जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रमोद कुचीवाले, आई -वडील आदींचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर, संस्थेचे संचालक युवराज पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
हेही वाचा
कोल्हापूर : वाठारच्या उपसरपंचपदी महेश कुंभार बिनविरोध
कोल्हापूर : दामदुपटीच्या आमिषाने कोटीचा गंडा; जीएसटी अधिकार्यासह 5 जणांना अटक
कोल्हापूर : पूर नियंत्रणासाठी 800 कोटींचा आराखडा
The post कोल्हापूर : सरूड येथील प्रथमेश केसरेची क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड appeared first on पुढारी.
सरूड : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील श्री शिव -शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश केसरे याची राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. सद्या तो येथे विज्ञान शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत आहे. कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत प्रथमेश केसरे याने दुसरे स्थान मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला …
The post कोल्हापूर : सरूड येथील प्रथमेश केसरेची क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड appeared first on पुढारी.