Pune : पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा फुटण्याची शक्यता

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्ह्यातील पारनेर, आळकुटी आदी भागासह जुन्नर तालुक्यातील बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, रानमळा आदी गावांना वरदान ठरलेला पिंपळगाव जोगा धरणाचा डाव्या कालवा दुरवस्थेमुळे फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाने तातडीने या कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या अस्तरिकरणास भेगा पडून … The post Pune : पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.
#image_title

Pune : पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा फुटण्याची शक्यता

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्ह्यातील पारनेर, आळकुटी आदी भागासह जुन्नर तालुक्यातील बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, रानमळा आदी गावांना वरदान ठरलेला पिंपळगाव जोगा धरणाचा डाव्या कालवा दुरवस्थेमुळे फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाने तातडीने या कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या अस्तरिकरणास भेगा पडून मोठमोठ्या बाभळींसह अन्य झाडे-झुडुपे उगवली आहेत. झाडांच्या मुळ्यांमुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपते. तसेच कालव्यात दगडगोट्यांसह इतर राडारोडा साचलेला आहे. परिणामी कालव्याची वहन क्षमता कमी होत पाण्याच्या अतिदाबाने कालवा केव्हाही फुटू शकतो. जागोजागी अशी अवस्था आहे. या कालव्यास आवर्तन सुरू झाले आहे. कालवा फुटल्यास लगतच्या शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वेळीच जलसंपदा विभागाने कालव्यातील झाडे-झुडुपे काढून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
The post Pune : पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.

बेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्ह्यातील पारनेर, आळकुटी आदी भागासह जुन्नर तालुक्यातील बेल्हे, राजुरी, आळे, वडगाव आनंद, रानमळा आदी गावांना वरदान ठरलेला पिंपळगाव जोगा धरणाचा डाव्या कालवा दुरवस्थेमुळे फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाने तातडीने या कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या अस्तरिकरणास भेगा पडून …

The post Pune : पिंपळगाव जोगा धरणाचा डावा कालवा फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Go to Source