नागपूर : शरद पवार यांची गरज राष्ट्रीय राजकारणात : डॉ यशवंत मनोहर

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा भारतातील मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची स्थानिक, प्रादेशिक पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात गरज आहे. 70-80 टक्के बहुजनांना एकत्रित करीत भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी तुमचे नेतृत्व उपयुक्त ठरू शकते अशी सदिच्छा ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस नागपुरात मंगळवारी साधेपणाने साजरा झाला. … The post नागपूर : शरद पवार यांची गरज राष्ट्रीय राजकारणात : डॉ यशवंत मनोहर appeared first on पुढारी.
#image_title

नागपूर : शरद पवार यांची गरज राष्ट्रीय राजकारणात : डॉ यशवंत मनोहर

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा भारतातील मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची स्थानिक, प्रादेशिक पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात गरज आहे. 70-80 टक्के बहुजनांना एकत्रित करीत भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी तुमचे नेतृत्व उपयुक्त ठरू शकते अशी सदिच्छा ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस नागपुरात मंगळवारी साधेपणाने साजरा झाला. पवार यांनी नागपूर सोडण्यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या लुम्बिनी या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सोबत प्रांताध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, प्रकाश गजभिये आणि इतरही काही मान्यवर उपस्थित होते. जवळ जवळ पाऊण तास ते मनोहर यांच्या घरी होते.
यशवंत मनोहर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने पवार साहेबांना सर्वांच्या वतीने सदिच्छा दिल्या. सर्व बहुजननिष्ठ पक्षांच्या आणि संघटनांच्या एकजुटीसाठी पवार साहेबांनी राष्ट्रीय पातळीवर प्रामुख्याने लक्ष घालावं अशी सद्भावनाही मनोहरांनी यावेळी व्यक्त केली. या छोट्याशा कौटुंबिक कार्यक्रमाला पुष्पलता मनोहर, मॅक्झिम मनोहर, नानू नेवरे आणि विवेक पुराडभट असे मोजके लोक उपस्थित होते. पवार साहेबांनी दिलेली ही सदिच्छा भेट साहित्यासंबंधी त्यांना वाटणा-या प्रेमाची द्योतक आहे. पवार साहेबांनी यशवंत मनोहर यांच्या नव्या लेखनाचीही चौकशी केली. यशवंत मनोहर यांनी त्यांच्या या साहित्याच्या आस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा : 

Winter Session 2023 : लोकसभेत कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी गॅलरीतून मारली उडी     
नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात गॅलरी पासेस देण्यास बंदी     
Bharat Gogawale : शिवाजी महाराज सुरतेला गेले होते म्हणून मी सुद्धा गेलो; उलटतपासणीत गोगावलेंचं खळबळजनक  उत्तर    

The post नागपूर : शरद पवार यांची गरज राष्ट्रीय राजकारणात : डॉ यशवंत मनोहर appeared first on पुढारी.

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा भारतातील मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची स्थानिक, प्रादेशिक पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय राजकारणात गरज आहे. 70-80 टक्के बहुजनांना एकत्रित करीत भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी तुमचे नेतृत्व उपयुक्त ठरू शकते अशी सदिच्छा ज्येष्ठ साहित्यिक डॉ यशवंत मनोहर यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस नागपुरात मंगळवारी साधेपणाने साजरा झाला. …

The post नागपूर : शरद पवार यांची गरज राष्ट्रीय राजकारणात : डॉ यशवंत मनोहर appeared first on पुढारी.

Go to Source