नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी उलटतपासणीत सुरत-गुवाहाटी दौऱ्यावरून टोलेबाजी केली. सुरतला एकट्यानेच गाडीने गेलो. ‘छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) तिकडे गेले होते, म्हणून मला वाटले ते चांगले ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो’ असे खळबळजनक उत्तर गोगावले यांनी दिले. तसेच सत्तांतराच्या काळात दिलेल्या मुलाखतीत तुम्ही मंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत होतात या प्रश्नावर, ‘कुठे झालो मी मंत्री? इच्छा प्रत्येकाची असते. मी अजून कुठे मंत्री झालो आहे’ असा प्रतिप्रश्न गोगावलेंनी केला.
शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील (Shiv Sena MLA Disqualification Case) साक्ष नोंदणी आणि उलटतपासणीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील या सुनावणीत २१ नोव्हेंबरपासून शिवसेना ठाकरे गटाच्या दोन तर शिंदे गटाच्या पाच अशा एकूण सात जणांची साक्ष नोंदणी आणि उलटतपासणी घेण्यात आली. तर, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू गैरहजर राहिले. अपात्रता याचिकांवर येत्या सोमवारपासून दोन्ही गटांकडून अंतिम युक्तिवादाला सुरूवात होणार आहे. (Bharat Gogawale)
आमदार अपात्रता प्रकरणी (Shiv Sena MLA Disqualification Case) ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर सलग सुनावण्यांना सुरूवात झाली. मुंबईतील विधानमंडळात ठाकरे गटाचे प्रतोद आ. सुनील प्रभू व कार्यालय सचिव विजय जोशी यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी उलटतपासणी घेतली. त्यानंतर नागपुरात शिंदे गटाच्या नेत्यांची उलटतपासणी झाली. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. दिलीप लांडे, आ. योगेश सागर, खा. राहुल शेवाळे, मंत्री दीपक केसरकर व आ. भरत गोगावले यांची उलटतपासणी घेतली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांचा सुरत-गुवाहाटी दौरा, शिवसेनेची घटना, घटनादुरूस्ती, पक्षांतर्गत निवडणुका, दोन्ही गटाकडून जारी व्हीप, बैठकांच्या हजेरीपटावरील सह्यांचे मुद्यांवर सवालजवाब झाले. तर, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
उलटतपासणीतील दावे, प्रतिदावे व लेखी सादर पुराव्यांच्या आधारे आता अंतिम युक्तिवाद केला जाईल. सोमवारपासून सलग तीन दिवस हा युक्तिवाद चालेल.त्यासाठी दोन्ही गटांना साधारण दीड दिवस मिळतील. २० डिसेंबर रोजी युक्तिवाद पूर्ण करण्याबाबत राहूल नार्वेकर आग्रही आहेत. युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निकालाचा दिवस निश्चित करतील.
केसरकरांसमोर राज्यपालांकडील ठरावाचा प्रश्न
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी कायम रहावे. पण, महाविकास आघाडीतून बाहेर पडावे इतकाच आग्रह होता, अशी भूमिका मंत्री दीपक केसरकर यांनी उलटतपासणीत मांडला. त्यावर, मुख्यमंत्री पद नको होते तर महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे ठराव का पाठविलात, याच ठरावामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेना आमदारांचा पाठिंबा गमावल्याचे राज्यपालांचे मत बनले आणि त्यांनी ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिल्याचे सांगत ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्नाची सरबत्ती केली. तर, सुरत-गुवाहाटीचा खर्चाचा प्रश्न वैयक्तिक माहिती असल्याचे सांगत केसरकरांनी टोलवला. लोकप्रतिनीधीचा प्रवास व हॉटेलचा खर्च ‘थर्ड पार्टी’ने केले का, असा आरोप खोटा असल्याचे केसरकर म्हणाले.
हेही वाचा :
मध्य प्रदेशमध्ये मोहन’राज’ला प्रारंभ, मुख्यमंत्रीपदी मोहन यादव
जुन्या पेन्शनबाबत मोठी घोषणा, अजित पवार विधान परिषदेत म्हणाले…
मी मुख्यमंत्री असतो तर तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नसती : उद्धव ठाकरेंचा जुन्या पेन्शन आंदोलनात दावा
‘ड्रग्स प्रकरणात पोलिसांचा थेट सहभाग आढळल्यास होणार बडतर्फ’
The post ‘शिवाजी महाराज सुरतेला गेले होते म्हणून मी सुद्धा गेलो’ appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी उलटतपासणीत सुरत-गुवाहाटी दौऱ्यावरून टोलेबाजी केली. सुरतला एकट्यानेच गाडीने गेलो. ‘छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) तिकडे गेले होते, म्हणून मला वाटले ते चांगले ठिकाण असणार म्हणून मी तिकडे गेलो’ असे खळबळजनक उत्तर गोगावले यांनी दिले. तसेच सत्तांतराच्या काळात दिलेल्या मुलाखतीत तुम्ही मंत्री …
The post ‘शिवाजी महाराज सुरतेला गेले होते म्हणून मी सुद्धा गेलो’ appeared first on पुढारी.