पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले

‘बिबट्या’ नाव जरी उचारले तरी अंगावर काटा येतो. पण अवघ्या नऊ वर्षाच्या अभिषेकने तब्बल दोन बिबट्यांना चक्क शौच्याच्या बादलीने हुसकावून लावले. यावेळी एका बिबट्याने त्याच्यावर हल्लाही केला. दुसरा बिबट्याही अंगावर चालून आला. यात त्याच्या शरिराच्या पृष्ठभागाला बिबट्याचे नख लागल्याने, मोठी जखमही झाली. मात्र, किंचितही न डगमगता त्याने शौच्याच्या बादलीने दोन्ही बिबट्यांचा हल्ला परतवून लावला. अभिषेकच्या … The post पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले appeared first on पुढारी.
#image_title

पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले

नाशिक : सतीश डोंगरे

‘बिबट्या’ नाव जरी उचारले तरी अंगावर काटा येतो. पण अवघ्या नऊ वर्षाच्या अभिषेकने तब्बल दोन बिबट्यांना चक्क शौच्याच्या बादलीने हुसकावून लावले. यावेळी एका बिबट्याने त्याच्यावर हल्लाही केला. दुसरा बिबट्याही अंगावर चालून आला. यात त्याच्या शरिराच्या पृष्ठभागाला बिबट्याचे नख लागल्याने, मोठी जखमही झाली. मात्र, किंचितही न डगमगता त्याने शौच्याच्या बादलीने दोन्ही बिबट्यांचा हल्ला परतवून लावला. अभिषेकच्या या शौर्याचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.  (Nashik Leopard Attack)
नाशिकरोड परिसरातील पिंपळगाव खांब येथे राहणारा अभिषेक सोमनाथ चारोस्कर हा घराला लागूनच असलेल्या बंधाऱ्याच्या कडेला दुपारी चार वाजेच्या सुमारास शौच्यास गेला होता. याचवेळी अचानक एक बिबट्या त्याच्या समोर आला. अभिषेक स्वत:ला सावरत नाही, तोच आणखी एक बिबट्या त्याठिकाणी आला. मात्र, अभिषेकने प्रसंगावधान राखत निर्भिडपणे या बिबट्यांचा (Nashik Leopard Attack) सामना केला. याविषयी त्याला विचारले असता तो म्हणाला, बिबट्याला बघितल्यानंतर मला खूप भिती वाटली. काय करावे, काहीच सूचत नव्हते. त्यातच दुसराही बिबट्या आल्याने, अंगावर थरकाप उडाला. रडायला आले. आरडाओरड करणार, तोच एक बिबट्या अंगावर धावून आला. त्याने माझ्या पृष्ठभागावर पंज्या मारला. त्यामुळे मी जोरात ओरडले. आवाजामुळे कदाचित तो मागे सरला. तोवर दुसरा बिबट्या धावून आला. मी खूप घाबरलो. काय करावे, काहीच सूचत नव्हते. आरडाओरड करूनही बिबटे पळत नव्हते. याशिवाय जवळपास काठी, दगड काहीच नव्हते. अशात शौच्यास आणलेली बादली हातात घेतली. बिबट्या जवळ येणार तोच त्याच्या दिशेने भिरकावली. त्यामुळे दोन्ही बिबटे काहीशे बिथरले. आरडाओरड अन् बादलीचा वार सुरू केल्याने दोन्ही बिबट्यांनी धूम ठोकली.
बिबटे पळाल्याच्या काही वेळातच आजुबाजुचे लोकही माझ्या दिशेने पळत आले. त्यांनी मला जवळ घेतले. घरी आईकडे नेले. मी काही सांगायच्या आत त्या लोकांनीच माझ्या आईला सर्व हकीकत सांगितली. शरिरावरची जखम बघून, आईने रडायला सुरुवात केली. त्यानंतर मला बिटको रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी लगेचच रुग्णालयातून सुट्टी मिळाली अन् मी शाळा गाठली. (Nashik Leopard Attack)
अभिषेक आमचा धाडसी विद्यार्थी आहे. अभ्यासातही तो हुशार आहे. धाडस आणि हुशारीमुळे तो आज स्वत:चा जीव वाचवू शकला. अभिषेकने दाखविलेले धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे.– संजय भोईर, शिक्षक
पिंपळगाव खांब या परिसरात बिबट्यांचा वावर नित्यांचाच झाला आहे. त्यामुळे वन विभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करायला हवा. अभिषेकसोबत जी घटना घडली, ती अन्य कोणासोबतही घडू नये. अभिषेकने दाखविलेल्या धाडसाचे खरोखरच कौतुक आहे. – जगदीश पवार, माजी नगरसेवक.
हेही वाचा :

Nashik Leopard Attack : प्रसंगावधान राखत मुलाने परतवला बिबट्याचा हल्ला
Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप
Namami Goda : नमामि गोदा’ प्रकल्पासाठी फेरसर्वेक्षण पूर्ण; कसा आहे प्रकल्प? किती येणार खर्च?

The post पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले appeared first on पुढारी.

‘बिबट्या’ नाव जरी उचारले तरी अंगावर काटा येतो. पण अवघ्या नऊ वर्षाच्या अभिषेकने तब्बल दोन बिबट्यांना चक्क शौच्याच्या बादलीने हुसकावून लावले. यावेळी एका बिबट्याने त्याच्यावर हल्लाही केला. दुसरा बिबट्याही अंगावर चालून आला. यात त्याच्या शरिराच्या पृष्ठभागाला बिबट्याचे नख लागल्याने, मोठी जखमही झाली. मात्र, किंचितही न डगमगता त्याने शौच्याच्या बादलीने दोन्ही बिबट्यांचा हल्ला परतवून लावला. अभिषेकच्या …

The post पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले appeared first on पुढारी.

Go to Source