एक घटस्फोट असाही : अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेत राहणार्या पती-पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे यांनी हा आदेश दिला आहे. अमेरिकेत असल्याने दोघांचे वडील पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणून येथील न्यायालयात हजर राहत होते. 2021 मध्ये त्यांनी दावा दाखल केला होता. त्याचे रूपांतर परस्पर संमतीमध्ये होऊन दावा निकाली निघाला.
माधव आणि माधवी ( नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही पुण्याचेच उच्च शिक्षित इंजिनिअर. पारंपारिक पध्दतीने 2015 मध्ये विवाह झाला. काही दिवस सुरळीत संसार केल्यानंतर दोघे अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे गेले. माधव नोकरी करायचा. नंतर माधवीही करू लागली. मात्र, 2017 पासून दोघांमध्ये वैचारिक मतभेदाने वाद निर्माण होऊ लागले. एकाच घरात राहत असताना नाते संपले होते. त्याने वडिलांना पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला. तिचेही वडिल पॉवर ऑफ अॅटर्नीच्या माध्यमातून दाव्यात हजर झाले. दोघात समुपदेशन करण्याचा प्रयत्न न्यायालयात करण्यात आला.
मात्र, त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे दावा चालविण्यास सुरूवात झाली. न्यायालय आणि वकिलांच्या प्रयत्नाने एकतर्फी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या दाव्याचे रुपांतर परर्स्प संमतीने झाले. दोघेही ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अमेरिकेतून न्यायालयात हजर झाले. घटस्फोटाचा दावा निकाली निघाला. स्त्रीधन, लग्नातील साहित्य आणि एक मोठी रक्कम पत्नीला देण्यात आली. माधवीच्या वतीने अॅड.राणी सोनकांबळे यांनी काम पाहिले.
पारंपरिक पध्दतीनुसार घटस्फोट घेण्यासाठी दोघांनाही न्यायालयात हजर राहावे लागले असते. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे दोघे अमेरिकेतूनच न्यायालयात हजर झाले. 2021 मध्ये दाखल केलेला दावा परस्पर संमतीने निकाली निघाला. या निर्णयामुळे वेळ, पैशाची बचत झाली. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
-अॅड. राणी कांबळे़-सोनावणे, पत्नीच्या वकील.
हेही वाचा
Pune News : मंतरवाडी चौकात रास्ता रोको; महापालिका प्रशासनाचा निषेध
Pune News : तहानलेल्या लोहगावकरांचा पाण्यासाठी टाहो!
Pune News : नियम पाळा; अन्यथा कारवाई अटळ!
The post एक घटस्फोट असाही : अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेत राहणार्या पती-पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनीषा काळे यांनी हा आदेश दिला आहे. अमेरिकेत असल्याने दोघांचे वडील पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणून येथील न्यायालयात हजर राहत होते. 2021 मध्ये त्यांनी दावा दाखल केला होता. त्याचे रूपांतर परस्पर संमतीमध्ये होऊन दावा निकाली निघाला. माधव …
The post एक घटस्फोट असाही : अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट appeared first on पुढारी.