नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढतो आहे. मंगळवारी (दि.१२) शहरात किमान तापमानाचा पारा १४ अंशांवर स्थिरावल्याने थंडीची लाट निर्माण झाली आहे. नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. निफाडमध्येही पाऱ्यातील घसरण कायम असल्याने तालुका गारठून गेला आहे. (Nashik Cold)
उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे नाशिकच्या तापमानात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यानंतर प्रथमच पारा १५ अंशांखाली घसरला आहे. वातावरणातील या बदलाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. विशेष करून रात्रीच्या वेळी थंडीचा वेग अधिक असल्याने नागरिक गारठून जात आहेत. तर पहाटेही धुक्यात शहर हरवून जात आहे. धुक्याचा परिणाम सकाळी ८ ते ८.३० पर्यंत कायम राहत असल्याने दैनंदिन जनजीवन विस्काळीत होत आहे. तर गुलाबी थंडीसोबत नाशिककर पहाटेच जिम, जॉगिंग ट्रॅक तसेच मैदानांवर गर्दी करताना दिसून येत आहेत. (Nashik Cold)
ग्रामीण भागातही पाऱ्यातील बदल कायम आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाडसह अन्य तालुक्यांत थंडीचा जोर जाणवतो आहे. निफाडच्या कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये मंगळवारी (दि.१२) १३ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद केली. अवघ्या तालुक्यात थंडीचा जोर वाढल्याने द्राक्षबागांसह अन्य पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या शीतवाऱ्यांना सध्या अडथळा येत नसल्याने येत्या काळात थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा :
अडकलेली ‘बुलेट’
सांगलीच्या पूर नियंत्रणासाठी ८८० कोटींच्या आराखड्यास मंजुरी
The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढतो आहे. मंगळवारी (दि.१२) शहरात किमान तापमानाचा पारा १४ अंशांवर स्थिरावल्याने थंडीची लाट निर्माण झाली आहे. नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. निफाडमध्येही पाऱ्यातील घसरण कायम असल्याने तालुका गारठून गेला आहे. (Nashik Cold) उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे नाशिकच्या तापमानात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यानंतर प्रथमच …
The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला appeared first on पुढारी.