पुणे : पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही जि. प. कडून क्षमतावृद्धी
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमधील पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांची क्षमतावृध्दी करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 डिसेंबर 2023 ते 20 मार्च 2024 दरम्यान उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे भाषा आणि गणित विषयांचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पाहिल्या टप्यात पहिलीचे वर्गस्तर प्रथम मूल्यमापन पूर्ण होईल. यानंतर पुढील 3 महिने प्रत्यक्ष वर्गस्तर अध्यापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, कार्यक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी 100 टक्के मुलांचे अंतिम मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे.
‘निपुण भारत’ अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. 2026-2027 पर्यंत इयत्ता 3 री पर्यंतच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना मुलभूत वाचन व संख्या ज्ञानाची सर्व क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अंगणवाडी/पूर्वप्राथमिक शिक्षणानंतर इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारे मूल नव्याने औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात येत असते. हे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर दूरगामी परिणाम करणारे आहे हे आपण जाणतो.
पहिलीमध्ये दाखल होणार्या विद्यार्थ्याला त्या वर्गाच्या क्षमता प्राप्त व्हाव्यात, याकरिता शासन स्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. जसे की, शाळापूर्व तयारी, विद्या प्रवेश, माता पालक गट, कृतिपुस्तिकांची निर्मिती, पुणे डायटद्वारे तयार करण्यात आलेला निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम इत्यादी. या जोडीला शाळास्तरावर गणितपेटी, भाषापेटी, इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहेत. या उपलब्ध साधनसामग्रीचा व यंत्रणेचा वापर करून पहिलीमधील विद्यार्थी वर्षाअखेरीस अपेक्षित क्षमता प्राप्त करतील याकरिता सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित कार्यक्रम राबवण्याचे नियोजन जिल्हास्तरावरून करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा
ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी केल्यास कारवाई
दुष्काळ पाहणी दौर्यातून सांगलीस वगळले; शेतकर्यांतून नाराजी
दुष्काळी तालुक्यांत पथक आता थेट बांधावर
The post पुणे : पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही जि. प. कडून क्षमतावृद्धी appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांमधील पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांची क्षमतावृध्दी करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 डिसेंबर 2023 ते 20 मार्च 2024 दरम्यान उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे भाषा आणि गणित विषयांचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पाहिल्या टप्यात पहिलीचे वर्गस्तर प्रथम मूल्यमापन पूर्ण होईल. यानंतर पुढील 3 महिने प्रत्यक्ष वर्गस्तर …
The post पुणे : पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही जि. प. कडून क्षमतावृद्धी appeared first on पुढारी.