विरोधात बोलायचे तर मंत्रिपद सोडा! पृथ्वीराज चव्हाण – भुजबळ यांच्यात खडाजंगी

नागपूर : आरक्षणावर चर्चेवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. पण मंत्रिमंडळातील सदस्य बाहेर न्या. शिंदे समिती बरखास्त करा, कुणबी दाखले देणे बंद करा, अशा मागण्या करून मराठा ओबीसीत तेढ निर्माण करत असतील तर ते बरोबर नाही. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
त्यावर भुजबळांनी सांगितले की, दोन महिने मी शांत होतो. पण बीडमध्ये जो हिंसाचार झाला आणि दोन आमदारांची घरे जाळली ते पाहिल्यावर मी स्वतःला रोखू शकलो नाही. मला जर शिवीगाळ केली जात असेल तर मी एकदा नाही शंभरवेळा बोलेन, असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले. त्यावर पृथ्वीराज चव्हाण चांगलेच संतापले. ते म्हणाले, तुम्ही मंत्री म्हणून असे वागू शकत नाही. तुम्हाला बोलायचे असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि नंतर बोला. त्यावर मात्र भुजबळ शांत झाले.
हेही वाचा :
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन, वयाच्या ७८ व्या वर्षी…
महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला दुबईत अटक
जुन्या पेन्शनसाठी सरकारी अधिकार्यांचे उद्या सामूहिक रजा आंदोलन
The post विरोधात बोलायचे तर मंत्रिपद सोडा! पृथ्वीराज चव्हाण – भुजबळ यांच्यात खडाजंगी appeared first on पुढारी.
नागपूर : आरक्षणावर चर्चेवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. पण मंत्रिमंडळातील सदस्य बाहेर न्या. शिंदे समिती बरखास्त करा, कुणबी दाखले देणे बंद करा, अशा मागण्या करून मराठा ओबीसीत तेढ निर्माण करत असतील तर ते …
The post विरोधात बोलायचे तर मंत्रिपद सोडा! पृथ्वीराज चव्हाण – भुजबळ यांच्यात खडाजंगी appeared first on पुढारी.
