न्यायमूर्तींची कार हिसकावून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण…

ग्वाल्हेर; वृत्तसंस्था : शिवपुरीतील पी. के. विद्यापीठाचे कुलगुरू रणजितसिंह यादव (वय 59) हे रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातून परतत असलेल्या बोगीतील दोघांनी ग्वाल्हेर स्थानकावर त्यांना उतरवले. स्थानकावर उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींची कार जबरदस्तीने हिसकावून या कारमधून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण कुलगुरूंना वाचवता आले नाही. न्यायमूर्तींची कार पळविली … The post न्यायमूर्तींची कार हिसकावून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण… appeared first on पुढारी.
#image_title

न्यायमूर्तींची कार हिसकावून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण…

ग्वाल्हेर; वृत्तसंस्था : शिवपुरीतील पी. के. विद्यापीठाचे कुलगुरू रणजितसिंह यादव (वय 59) हे रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातून परतत असलेल्या बोगीतील दोघांनी ग्वाल्हेर स्थानकावर त्यांना उतरवले. स्थानकावर उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींची कार जबरदस्तीने हिसकावून या कारमधून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण कुलगुरूंना वाचवता आले नाही. न्यायमूर्तींची कार पळविली म्हणून पोलिसांनी स्वाभाविकपणे शहरात नाकेबंदी केली…
कार एके ठिकाणी उभी असलेली आढळली. पोलिस ती पळविणार्‍या दोघांपर्यंत पोहोचलेच आणि दोघांना (हिमांशू आणि सॉक्रेटिस) अटकही केली. दोघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या अटकेचा निषेध केला आणि पोलिस ठाण्यालाच घेराव घातला. हिमांशू आणि सॉक्रेटिसची पद्धत चुकीची असली, तरी त्यांचा हेतू उदात्त होता. अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांनी कार हिसकावली होती. दोघांविरुद्ध दाखल दरोड्याचा गुन्हा तत्काळ मागे घेतला नाही, तर पोलिस ठाण्याला आमचा घेराव कायम राहील, असे विद्यार्थी परिषदेकडून सांगण्यात आले.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भोपाळहून परतणार होते म्हणून त्यांचा चालक त्यांना घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेला होता आणि कार अशी पळविली गेली होती.

The post न्यायमूर्तींची कार हिसकावून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण… appeared first on पुढारी.

ग्वाल्हेर; वृत्तसंस्था : शिवपुरीतील पी. के. विद्यापीठाचे कुलगुरू रणजितसिंह यादव (वय 59) हे रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातून परतत असलेल्या बोगीतील दोघांनी ग्वाल्हेर स्थानकावर त्यांना उतरवले. स्थानकावर उच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींची कार जबरदस्तीने हिसकावून या कारमधून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण कुलगुरूंना वाचवता आले नाही. न्यायमूर्तींची कार पळविली …

The post न्यायमूर्तींची कार हिसकावून कुलगुरूंना रुग्णालयात नेले; पण… appeared first on पुढारी.

Go to Source