सोने 10 दिवसांत दोन हजारांनी, चांदी 4 हजार 200 ने स्वस्त
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : उच्चांकी पातळी गाठल्यानंतर सोने-चांदी दरात सतत घसरण सुरू आहे. गेल्या दहा दिवसांत सोने दरात 2000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी 4 हजार 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. जीएसटीशिवाय मंगळवारी सोने 61 हजार 360 रुपये, तर चांदी 71 हजार 840 रुपये होती.
सराफ व्यापारी संघाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.12) सोने दर 63 हजार 200 रुपये आणि चांदी दर 74 हजार रुपये झाला. (सोने दर प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेटचे आणि चांदी प्रति 1 किलोसाठी जीएसटीसह आहेत) इस्राईल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. युद्धापूर्वी 4 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याचा दर जीएसटीसह 58 हजार 100 रुपयांपर्यंत आणि एक किलो चांदीचा दर 69 हजार 200 रुपयांपर्यंत खाली आला होता. युद्ध सुरू झाल्यानंतर त्यात सतत वाढ होऊन 3 डिसेंबर रोजी सोने दर 65 हजार 200 रुपये, तर चांदी दर 78 हजार 200 रुपये या उच्चांकी पातळीवर गेले होते. त्यानंतर पुन्हा एकदा दरात घसरण सुरू झाली आहे.
The post सोने 10 दिवसांत दोन हजारांनी, चांदी 4 हजार 200 ने स्वस्त appeared first on पुढारी.
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : उच्चांकी पातळी गाठल्यानंतर सोने-चांदी दरात सतत घसरण सुरू आहे. गेल्या दहा दिवसांत सोने दरात 2000 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी 4 हजार 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. जीएसटीशिवाय मंगळवारी सोने 61 हजार 360 रुपये, तर चांदी 71 हजार 840 रुपये होती. सराफ व्यापारी संघाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.12) सोने दर …
The post सोने 10 दिवसांत दोन हजारांनी, चांदी 4 हजार 200 ने स्वस्त appeared first on पुढारी.