छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला पोकळ बांबूचे फटके; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार करून छळ केल्याचा आरोप असलेल्या तरुणाचे पीडितेच्या नातेवाईकांनीअपहरण केल्याची घटना समोर आली आहे. जिन्सी भागातील एका खोलीत डांबून नग्न करून त्याला पोकळ बांबूचे फटके दिले. बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी संशयित आरोपी तरुणावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना ९ … The post छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला पोकळ बांबूचे फटके; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
#image_title

छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला पोकळ बांबूचे फटके; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार करून छळ केल्याचा आरोप असलेल्या तरुणाचे पीडितेच्या नातेवाईकांनीअपहरण केल्याची घटना समोर आली आहे. जिन्सी भागातील एका खोलीत डांबून नग्न करून त्याला पोकळ बांबूचे फटके दिले. बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी संशयित आरोपी तरुणावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना ९ डिसेंबर रोजी दुपारी अडीच ते रात्री साडेदहा वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर ठाण्यात संशयित आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरव चंद्रभूषण दंडीमे (२७, रा. एन-२, सिडको, जयश्री कॉलनी, मुकंदवाडी) यातील संशयित आरोपीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, साैरव हा हॉटेल व्यावसायिक आहे. ९ डिसेंबरला तो त्याच्या कारमधून (एमएच २०, जीई ७७०९) शेफ टुबुभाईला भेटण्यासाठी सिडको बसस्थानक परिसरात आला होता. तेथून तो एपीआय कॉर्नरमार्गे प्रोझोन मॉल, मॉस्को कॉर्नरकडून एमआयडीसी सिडको ठाणे मार्गे मॅकडोनाल्ड येथे जात असताना दुपारी अडीच वाजता बीएमडब्ल्यू शोरूमसमोर काही अज्ञात लोकांनी त्याची कार अडविली. त्याच्या कारची तोडफोड करून अनोळखी लोकांनी त्याचे अपहरण केले.
अपहरणानंतर सौरवचला कारमध्ये बांबूच्या काठीने फटके देण्यात आले. त्यानंतर दुपारी ४ वाजता किराडपुर नजीकच्या नायरा पेट्रोलपंपाजवळ कार थांबवून त्याला उतरविले. तेथे बलात्कारातील पीडितेचे नातेवाईक थांबलेले होते. त्यांनी सौरवला पकडले आणि बेदम मारहाण केली. त्याला एका खोलीत कोंडून नग्न करून व्हिडिओ बनवण्यात आला व बांबूने सर्वांगावर फटके दिले. यादरम्यान, त्याचा अतोनात छळ करण्यात आला. त्यानंतर कोऱ्या बॉण्डपेपरवर त्याच्या सह्या घेतल्या. रात्री १०.३० वाजता त्याला दुसरे कपडे घालून दुचाकीवरून दोघांनी बळीराम पाटील चौकात आणून सोडले. तेथेही त्याला शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली आणि निघून गेले. वडिलांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहेत.
नेमके प्रकरण काय?
संशयित आरोपी सौरव दंडिमेसोबत विवाहितेची १० एप्रिल २०१९ रोजी फेसबुकवर ओळख झाली होती. काही दिवसांतच त्याने विवाहितेशी लगट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिने त्याला ब्लॉक केले. त्यानंतर त्याने पुन्हा इन्स्टाग्रामवर विवाहितेला फॉलो केले अन् तो तिच्या संपर्कात गेला. त्यानंतर ओळखीचे रुपांतर मैत्रित झाले. तो विवाहितेच्या घरापर्यंत गेला. यादरम्यान त्याने विवाहितेवर अत्याचार केला. यादरम्यान त्याने विवाहितेचे अश्लिल व्हिडिओ व फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून वेळोवेळी ११ लाख ३० हजार रुपये उकळले. हा प्रकार विवाहितेच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांनी सौरवसह त्याच्या पालकांना समज दिली होती. मात्र, तो वारंवार विवाहितेला त्रास देत होता. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास उपनिरीक्षक निसार शेख करीत आहेत.
The post छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला पोकळ बांबूचे फटके; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार करून छळ केल्याचा आरोप असलेल्या तरुणाचे पीडितेच्या नातेवाईकांनीअपहरण केल्याची घटना समोर आली आहे. जिन्सी भागातील एका खोलीत डांबून नग्न करून त्याला पोकळ बांबूचे फटके दिले. बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी संशयित आरोपी तरुणावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना ९ …

The post छत्रपती संभाजीनगर : बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला पोकळ बांबूचे फटके; दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Go to Source