बारा दिवसांनंतर जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत; प्रकृती खालावल्याने तातडीने होणार रुग्णालयात दाखल
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : राज्यव्यापी चौथ्या टप्प्याचा दौरा आटोपून मनोज जरांगे पाटील आज (दि. १२) बाराव्या दिवशी अंतरवाली सराटीत दाखल झाले. एक डिसेंबर पासून मनोज जरांगे पाटील मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा झंजावाती दौरा करून आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अंतरवाली येथे दाखल होताच गॅलेक्सी हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला. गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.
बीड जिल्ह्यातील सभेदरम्यानच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. आज बीड जिल्ह्यातील तीन सभांना ही त्यांनी संबोधित केले.काल त्यांच्यावर आंबेजोगाई डॉ. थोरात यांनी त्यांच्यावर उपचारही केले. डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम सांगितला होता. मात्र त्यांनी समाज बांधवांच्या गाठीभेटीचा दौरा अर्ध्यावर सोडणार नसून तो पूर्ण करणारच असल्याचा निर्धार केला. त्यामुळे आजच्या नियोजित सभा या होणार आणि त्याला मी जाणारच असा पवित्रा त्यांनी घेत आजचा दिवस ही त्यांनी धावपळीतच घालवला. त्यामुळे त्यांना अशक्तपणा, अंगदुखी असा त्रास जाणवत असल्याने त्यांनी अंतरवालीत दाखल होताच रूग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल होतात महिलांनी त्यांचे औक्षण केले. मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले मागास प्रवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचे अनेकजण राजीनामे देत आहेत. हे राजीनामा सत्र सरकारची खेळी तर नाही ना? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.आठ तारखेला अधिवेशन काळामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा करू असे सरकारने सांगितले होते. मात्र त्याबाबत सरकार चालढकलपणा करतय का? अशी शंकाही मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली.
नितेश राणे यांच्या व्यक्तावर बोलतांना ते म्हणाले,मराठा समाज कोण आहे काय आहे कोणाच्या पाठीमागे आहे ते २४ डिसेंबर नंतर कळेल, मी कधीच म्हणालो नाही, मी म्हणजे मराठा समाज आहे. उलट मी म्हणतो मराठा समाजाचे मी लेकरु आहे. माझा माय बाप हा समाज आहे समाजाला मी माय बाप मानतो असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत ही २४ डिसेंबरला संपते आहे.त्याआधी सरकार काही निर्णय घेते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी १७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील समाज बांधवांची, उपोषणकर्त्यांची, आंदोलकांची, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांची एक बैठक अंतरवाली सराटीत आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. या १७ तारखेला होणाऱ्या बैठकीमध्ये काही निर्णय घेतला जातो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.२४ डिसेंबर ची मुदत संपल्यावर आम्ही मुंबईला जाणार.आम्हाला मुंबई पाहायची आहे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. मग या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची रणनीती व दिशा ठरवली जाते का याकडे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या १७ तारखेच्या बैठकीकडे लागलेली आहे.
मागासप्रवर्ग आयोगाचे अध्यक्ष सदस्यांचे राजिनामा सत्र सुरू आहे यावर बोलताना जरांगे म्हणाले,आजपर्यंत दौऱ्यावर होतो त्यामुळे उद्या, सखोल मध्ये जातो.आरक्षणाची डेडलाईन जवळ आली राजिनामा सत्र म्हणजे काय ? पुन्हा एकदा डाव तर ओबीसी आयोगाचा मराठा समाजाला फसवाचा, सरकार आजपर्यंत चालढकल करते, गुन्हा दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात आले नाही, दोन दिवसात टाईमबाँन्ड देतो म्हणाले ते दिले नाही, आठ डिसेंबर रोजी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अधिवेशनात घेतो म्हणालो ते घेतले नाही.
The post बारा दिवसांनंतर जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत; प्रकृती खालावल्याने तातडीने होणार रुग्णालयात दाखल appeared first on पुढारी.
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : राज्यव्यापी चौथ्या टप्प्याचा दौरा आटोपून मनोज जरांगे पाटील आज (दि. १२) बाराव्या दिवशी अंतरवाली सराटीत दाखल झाले. एक डिसेंबर पासून मनोज जरांगे पाटील मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा झंजावाती दौरा करून आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अंतरवाली येथे दाखल होताच गॅलेक्सी हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला. गॅलेक्सी …
The post बारा दिवसांनंतर जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत; प्रकृती खालावल्याने तातडीने होणार रुग्णालयात दाखल appeared first on पुढारी.