बेळगावमधील दुसरा रेल्वेगेट अर्धा तास बंद! वाहन चालकांची तारांबळ
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगावमधील दुसरा रेल्वे गेट सुमारे अर्धा तास बंद ठेवल्यामुळे वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली. दोन्ही बाजूला शेकडोंच्या संख्येने वाहने थांबून राहिली तर पादचारीही ताटकळत उभे राहिले. सदर प्रकार दुसऱ्या रेल्वे गेटवर मंगळवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
बेळगावमधील रेल्वे स्टेशनहून 6:30 वाजता एक एक्सप्रेस खानापूर मार्गाने रवाना झाली. यानंतर पाच मिनिटात खानापूरकडून मालगाडी बेळगाव रेल्वे स्टेशनकडे आली. यादरम्यान गोंधळ झाल्याने सुमारे 25 मिनिटांहून अधिक काळ दुसरा रेल्वे गेट बंद ठेवण्यात आला होता. यावेळी उद्यमबागहून बेळगावकडे येणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी शेकडो वाहने थांबून होती तसेच काँग्रेस रोड ते उद्यमबाग असा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनाही मनस्ताप करावा लागला. वारंवार होणाऱ्या या प्रकारातील गोंधळ दूर करावा अशी मागणी संतप्त वाहन चालकातून व्यक्त होत आहे.
The post बेळगावमधील दुसरा रेल्वेगेट अर्धा तास बंद! वाहन चालकांची तारांबळ appeared first on पुढारी.
बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगावमधील दुसरा रेल्वे गेट सुमारे अर्धा तास बंद ठेवल्यामुळे वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली. दोन्ही बाजूला शेकडोंच्या संख्येने वाहने थांबून राहिली तर पादचारीही ताटकळत उभे राहिले. सदर प्रकार दुसऱ्या रेल्वे गेटवर मंगळवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहा वाजता घडला. बेळगावमधील रेल्वे स्टेशनहून 6:30 वाजता एक एक्सप्रेस खानापूर मार्गाने रवाना झाली. यानंतर पाच …
The post बेळगावमधील दुसरा रेल्वेगेट अर्धा तास बंद! वाहन चालकांची तारांबळ appeared first on पुढारी.