सूर्याचा धमाका! 2 हजार धावा पूर्ण, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो 36 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. याचबरोबर त्याने आणखीन एक मोठी कामगिरी नोंदवली. तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कमी डावांत दोन हजार धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला … The post सूर्याचा धमाका! 2 हजार धावा पूर्ण, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी appeared first on पुढारी.
#image_title

सूर्याचा धमाका! 2 हजार धावा पूर्ण, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो 36 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. याचबरोबर त्याने आणखीन एक मोठी कामगिरी नोंदवली. तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कमी डावांत दोन हजार धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. भारताकडून खेळताना सर्वात जलद दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम करणाऱ्या विराट कोहलीच्या विक्रमाचीही सूर्याने बरोबरी केली आहे. या दोघांनी 56-56 डावात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हा डावाच्या बाबतीत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान (52-52 डाव) हे दोघे आघडीवर आहेत. तर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav Record) यांनी 56-56 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. केएल राहुल 58 डावात 2 हजार धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठराला आहे.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 107 डावात 4008 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या खात्यात 140 डावात 3853 धावा असून केएल राहुलने 68 डावात 2256 धावांपर्यंत मजल मारली आहे. सूर्यकुमार यादवने 56 डावात 2041 धावा केल्या आहेत. (Suryakumar Yadav Record)
The post सूर्याचा धमाका! 2 हजार धावा पूर्ण, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav Record : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तो 36 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. याचबरोबर त्याने आणखीन एक मोठी कामगिरी नोंदवली. तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये कमी डावांत दोन हजार धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला …

The post सूर्याचा धमाका! 2 हजार धावा पूर्ण, कोहलीच्या विक्रमाची बरोबरी appeared first on पुढारी.

Go to Source