बीड : माजलगाव – तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेगात मोटारसायकल अडकून एकाचा मृत्यू
माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव – तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेंगामध्ये मोटरसायकलचे चाक अडकल्याने अपघात झाला. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. अब्दुल हाफिज सत्तार खान ( वय ४९) असे त्यांचे नाव आहे. आज (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
खामगाव – पंढरपूर या महामार्गावर दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमध्ये मोटरसायकलचे चाक अडकून अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. आज (मंगळवारी) पंचायत समिती पतसंस्थेचे कर्मचारी खान हे कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी सिरसाळा येथे निघाले होते. माजलगाव – तेलगाव रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोल पंपा समोर आले असता त्यांच्या मोटारसायकल (एम.एच.३८ ए ७२१८) चे चाक रस्त्यावरील भेगांमध्ये अडकले व मोटरसायकल जागेवरच पलटी झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर त्यांचा मृतदेह ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
हेही वाचा :
Nanded Accident : धनगर मोर्चातून परतणाऱ्या आंदोलकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघेजण जागीच ठार
अमरावती : सीआरपीएफ जवानाचा दुचाकी अपघातात मृत्यू
Nashik Accident : बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू
The post बीड : माजलगाव – तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेगात मोटारसायकल अडकून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.
माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव – तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेंगामध्ये मोटरसायकलचे चाक अडकल्याने अपघात झाला. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. अब्दुल हाफिज सत्तार खान ( वय ४९) असे त्यांचे नाव आहे. आज (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. खामगाव – पंढरपूर या महामार्गावर दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात …
The post बीड : माजलगाव – तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेगात मोटारसायकल अडकून एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.