नागपुरात रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली, कार्यकर्ते आक्रमक
पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची मराठवाड्यात आणि विदर्भात युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (दि.१२) सांगता झाली. परंतु, ही यात्रा विधान भवनाकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्ते संतप्त होऊन आक्रमक झाले. बॅरिकेट्स तोडून कार्यकर्त्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर रोहित पवारांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. Yuva Sangharsh Yatra
राज्यातील तरुणांच्या प्रश्नावर युवा संघर्ष यात्रेतून आवाज उठविण्यात आला होता. याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही यात्रा विधान भवनावर नेण्यात येत होती. दरम्यान पोलिसांनी ही यात्रा अडवल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बॅरिकेट्स तोडून विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्य़ात नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, युवा नेते रोहित पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Yuva Sangharsh Yatra
हेही वाचा
रोहित पवार राज्याचे नेते केव्हापासून झाले? : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल
Nagar : कुकडीचे आवर्तन आजपासून ; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश
Maharashtra Politics: साहेब, ‘व्यथा समजण्यासाठी केवळ सोन्याचा…’ रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
The post नागपुरात रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली, कार्यकर्ते आक्रमक appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची मराठवाड्यात आणि विदर्भात युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (दि.१२) सांगता झाली. परंतु, ही यात्रा विधान भवनाकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्ते संतप्त होऊन आक्रमक झाले. बॅरिकेट्स …
The post नागपुरात रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली, कार्यकर्ते आक्रमक appeared first on पुढारी.