प्रेमाची गोष्ट : सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो – नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता … The post प्रेमाची गोष्ट : सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी appeared first on पुढारी.
#image_title

प्रेमाची गोष्ट : सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो – नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता नाही तर गोखले आणि कोळी परिवार एकत्र येणार आहे.
संबंधित बातम्या 

Salaar Movie : सालार चित्रपटाला ‘सेन्सॉर’कडून ‘A’ प्रमाणपत्र, यादिवशी येणार
अप्पी आमची कलेक्टर : अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न!
Tamannaah Bhatia : रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीत बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना

आता कोळी म्हटलं की, हळदीला धुमशान झालं नाही तर नवलच. सागरच्या हळदीसाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबाने जय्यत तयारी केलीय. एरव्ही मॉडर्न अंदाजात दिसणारा सागर हळदीसाठी पारंपरिक कोळी वेशात दिसणार आहे. यातील खास म्हणजे, हळदी कार्यक्रमासाठी गायक दादूस हजेरी लावणार आहे. हळदीच्या कार्यक्रमात दादूस कोळी गाणी गाऊन धमाल करणार आहे.

दादूसच्या धमाकेदार कोळी गाण्यांवर संपूर्ण परिवार ठेका धरणार आहे. तिकडे मुक्ताच्या हळदीसाठीही संपूर्ण गोखले कुटुंब एकत्र येणार आहे. मुक्ताला आशीर्वाद देण्यासाठी लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कलाची आई म्हणजेच, संगीता देखील हजेरी लावणार आहे. त्यामुळे मुक्ता-सागरच्या हळदीची रंगत द्विगुणीत होणार आहे. यामुळे मालिकेच्या पुढच्या भागासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

The post प्रेमाची गोष्ट : सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरू झाली आहे. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो – नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता …

The post प्रेमाची गोष्ट : सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी appeared first on पुढारी.

Go to Source