२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झाले कियारा आडवाणी…

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगल या सर्च इंजिनवर २०२३ या वर्षामध्ये कियारा आडवाणी भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेली व्यक्ती आहे. त्याचबरोबर, सतीश कौशिक आणि मॅथ्यू पेरी यांची नावेदेखील सर्च झाली आहेत. (Google year in search) तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा भारतातील सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या व्यक्ती ठरला आहे. (Google year in search) संबंधित बातम्या – … The post २०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झाले कियारा आडवाणी… appeared first on पुढारी.
#image_title

२०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झाले कियारा आडवाणी…

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगल या सर्च इंजिनवर २०२३ या वर्षामध्ये कियारा आडवाणी भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेली व्यक्ती आहे. त्याचबरोबर, सतीश कौशिक आणि मॅथ्यू पेरी यांची नावेदेखील सर्च झाली आहेत. (Google year in search) तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा भारतातील सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या व्यक्ती ठरला आहे. (Google year in search)
संबंधित बातम्या –

Tamannaah Bhatia : रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीत बॉयफ्रेंडसोबत चमकली तमन्ना

HBD Rajinikanth : एकेकाळी बस कंडक्टर, आज कोट्यवधींची संपत्ती पाहून फुटेल घाम

Kaun Banega Crorepati 15 : बीडचे विश्वास डाकेच्या जिद्दीने अमिताभ बच्चनही प्रेरित

२०२३ सरते वर्ष आहे. Google India ने वर्षातील टॉप ट्रेंडिंग सर्चचा खुलासा केला आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट भारतातील सर्वाधिक शोधला जाणारा चित्रपट म्हणून अव्वल स्थानावर आहे. तर शाहिद कपूर आणि विजय सेतुपती यांचा वेब शो फरझीचे सर्वाधिक सर्च झाले आहे.
भारतातील टॉप ट्रेंडिंग व्यक्तिमत्व:
यारा आडवाणी भारतातील एक टॉपची अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे. तिने ट्रेंडिंग व्यक्तीमत्वाच्या यादीत आपले नाव अग्रभागी ठेवले आहे. जागतिक कलाकारांच्या यादीतही तिने उल्लेखनीय स्थान मिळवले आहे. तिचा पती, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रादेखील भारतातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. हे कियारा-सिद्धार्थ हे कपल फेब्रुवारीमध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यावेळी त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. रिअ‍ॅलिटी शो स्टार आणि YouTuber एल्विश यादवनेही या यादीत स्थान मिळवले. तो भारतातील पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक शोधला जाणारा व्यक्तिमत्त्व बनला.
२०२३ मध्ये दोन लोकप्रिय सेलिब्रिटी बॉलीवूड अभिनेता सतीश कौशिक आणि फ्रेंड्स स्टार मॅथ्यू पेरी यांचे निधन झाले. या दोन्ही दिग्गजांची नावेदेखील भारतातील टॉप ट्रेंडिंग सर्चमध्ये (न्यूज इव्हेंट्स) मध्ये समाविष्ट आहेत. सतीश कौशिक यांचे ९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. मॅथ्यू पेरी यांनी २८ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
लोकल ओटीटी कंटेंटमध्ये ट्रेंडिंग शोमध्ये ‘फर्जी’ने अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर अमेरिकन Wednesday दुसऱ्या स्थानावर होती. असुर आणि राणा नायडू सारख्या भारतीय शोने अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळविले आहे. स्कॅम २००३ (६ वे स्थान), बिग बॉस १७ (७ वे स्थान), गन्स अँड गुलाब्स (८ वे स्थान), आणि ताजा खबर (१० वे स्थान) हे भारतीय शो होते. ‘अमेरिकन पोस्ट-अपोकॅलिप्टिक ड्रामा, द लास्ट ऑफ अस’ पाचव्या स्थानावर आहे.
इतर चित्रपटांमध्ये अदा शर्माचा द केरळ स्टोरी (६ व्या स्थानी), रजनीकांतचा जेलर (७ व्या स्थानी), विजयचा लिओ (८व्या स्थानी), सलमान खानचा टायगर ३ (९व्या स्थानी) आणि विजयचा आणखी एक चित्रपट वारिसू (१० व्या स्थानी ) यांचा समावेश आहे. अरिजित सिंगच्या केसरीया गाण्याने सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गाण्यांच्या जागतिक यादीत २रे स्थान मिळवले आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

The post २०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झाले कियारा आडवाणी… appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगल या सर्च इंजिनवर २०२३ या वर्षामध्ये कियारा आडवाणी भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेली व्यक्ती आहे. त्याचबरोबर, सतीश कौशिक आणि मॅथ्यू पेरी यांची नावेदेखील सर्च झाली आहेत. (Google year in search) तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा भारतातील सहाव्या क्रमांकावर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या व्यक्ती ठरला आहे. (Google year in search) संबंधित बातम्या – …

The post २०२३ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झाले कियारा आडवाणी… appeared first on पुढारी.

Go to Source