बांधकाम विभागाच्या कार्यालयात राडा? धारधार हत्यारांचा वापर

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ;  येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयामध्ये सकाळी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान दोन गटात राडा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी धारधार हत्यारांचा वापर झाल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एस आय डी, एल सी बी जिल्हा पेठ पोलीस … The post बांधकाम विभागाच्या कार्यालयात राडा? धारधार हत्यारांचा वापर appeared first on पुढारी.
#image_title

बांधकाम विभागाच्या कार्यालयात राडा? धारधार हत्यारांचा वापर

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ;  येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयामध्ये सकाळी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान दोन गटात राडा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी धारधार हत्यारांचा वापर झाल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एस आय डी, एल सी बी जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी हे माहिती घेण्यासाठी आले होते. जिल्ह्याचे कार्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्व विभागाचे कार्यालय आहे. आज (दि.  12)  या कार्यालयात सकाळी बारा-साडेबारा वाजेला सार्वजनिक बांधकाम विभागात एकच गोंधळ उडाला. या ठिकाणी काही जणांनी हत्यारे बाहेर काढली. हे बघून सर्वजण त्या ठिकाणाहून पसार झाले. या घटनेची माहिती हवे सारखी पोलीस प्रशासन व गोपनीय विभागाला मिळाली. यावेळी एल सी बी व जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी कार्यालयात आले, त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता कोणीही याबाबत झालेली घटना सांगायला तयार नव्हते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका टेंडरवरून दोन गटांमध्ये याठिकाणी राडा झाला. यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये हाणामारी वरुन हत्यारे काढली गेलेली आहेत मात्र अजूनही सीसीटीव्ही याठिकाणी लावण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
अधीक्षक अभियता प्रशांत सोनवणे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी साईटवर आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता कार्यालयात असे काहीच घडलेले नाही असे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा पेठ पोलीस निरीक्षक भ्रमणगाव संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा सांगितले की सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये झालेल्या प्रकाराबद्दल कोणीही तक्रार केलेली नाही.
हेही वाचा :

Dhule News : विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी, शासकीय योजनांची माहिती देते घरोघरी
कोल्‍हापूर ; सोन्या-चांदीची पोस्‍ट पार्सल म्‍हणजे..चार आण्याची कोंबडी अन्…
Crop Competition : रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभाग घ्या, 31 डिसेंबर पर्यंत करा अर्ज

The post बांधकाम विभागाच्या कार्यालयात राडा? धारधार हत्यारांचा वापर appeared first on पुढारी.

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ;  येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयामध्ये सकाळी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान दोन गटात राडा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी धारधार हत्यारांचा वापर झाल्याची माहिती आहे. मात्र, याबाबत कोणीही पोलिसांत तक्रार केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एस आय डी, एल सी बी जिल्हा पेठ पोलीस …

The post बांधकाम विभागाच्या कार्यालयात राडा? धारधार हत्यारांचा वापर appeared first on पुढारी.

Go to Source