पुढारी ऑनलाईन डेस्क : Stock Market Closing Bell : शेअर बाजारात आज (दि.१२) सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली. अखेर बाजारातील व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 394.82 अंकांनी घसरण अनुभवत 69,539.19 वर स्थिरावला तर निफ्टी 20,901.35 वर बंद झाला. याआधी सोमवारी (दि.११) सेन्सेक्स 69,928 वर बंद झाला होता.
जागतिक भांडवली बाजारांमधील मिळणारे सकारात्मक संकेतामुळे आज (दि. १२ डिसेंबर) आठवड्याच्या सलग दुसर्या दिवशीच्या प्रारंभी शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम राहिली. निर्देशांकांनी मंगळवारी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 21,031 ची पातळी गाठली. सेन्सेक्सही 70000 च्या वर पोहोचला. मात्र सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली. दुपारी सध्या सेन्सेक्स 69,750 आणि निफ्टी 20,950 च्या जवळ व्यवहार करता दिसले. (Stock Market Closing Bell)
आयटी, औषध निर्मिती कंपन्यांच्या शेअर्सना पसंती
नवीन शिखर गाठल्यानंतर मिडकॅप शेअर्संनी घसरण अनुभवली. आयटी आणि फार्मा समभागांमध्ये गुंतवणूकदारांचा खरेदीचा मूड दिसला. टीसीएसने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. Coforge, Tata Elxsi आणि Persistent हे देखील चमकले. दुचाकी शेअर्सनीवाढीचा वेग वाढला आहे. बजाज ऑटोने सुमारे 2% वाढीसह उच्चांक गाठला. हिरो मोटो आणि टीव्हीएसलाही तेजी मिळाली.
मेटल, फार्मा आणि पीएसयू बँकिंग समभागांनी बाजार वाढण्यास हातभार लावला आहे. याशिवाय विमा क्षेत्रातही मजबूत वाढ नोंदवली जात आहे. एसबीआय लाइफ आणि एचडीएफसी लाइफ निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढल्याचे दिसले. (Stock Market Closing Bell)
भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगला टाकले पिछाडीवर
देशांतर्गत शेअर बाजारासाठी २०२३ हे वर्ष लक्षणीय आणि स्मरणीय ठरले आहे. नुकतेच जागतकि बाजारपेठेचा विचारता करता भारताने भारतीय शेअर बाजाराने ! हाँगकाँगला पिछाडीवर टाकत सातव्या क्रमांकावर झेप घेतली असल्याचे ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्स्चेंज’च्या ताज्या आकडेवारीत नमुद करण्यात आले आहे.
भारतीय शेअर बाजाराचे बाजार मूल्य कितीवर पोहचले?
काही दिवसांपूर्वीच BSE चे एकूण बाजारमूल्य प्रथमच ४ ट्रिलियन रुपयांच्या वर पोहोचले होते. BSE निर्देशांक सेन्सेक्सने 70 हजारांचा आकडा पार केला. त्याचवेळी निफ्टीनेही 21,031 चा सर्वकालीन उच्चांक देखील गाठला. NSE चे बाजारमूल्य 3.989 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे, तर हाँगकाँगचे बाजारमूल्य 3.984 ट्रिलियन डॉलरवर आहे.
The post ‘विक्रमी’ उच्चांकानंतर तेजीला ‘ब्रेक’, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : Stock Market Closing Bell : शेअर बाजारात आज (दि.१२) सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर दिवसभरातील नीचांकी पातळी गाठली. अखेर बाजारातील व्यवहार बंद होताना सेन्सेक्स 394.82 अंकांनी घसरण अनुभवत 69,539.19 वर स्थिरावला तर निफ्टी 20,901.35 वर बंद झाला. याआधी सोमवारी (दि.११) सेन्सेक्स 69,928 वर बंद झाला होता. जागतिक भांडवली बाजारांमधील …
The post ‘विक्रमी’ उच्चांकानंतर तेजीला ‘ब्रेक’, जाणून घ्या आज बाजारात काय घडलं? appeared first on पुढारी.