मध्य प्रदेशात मामांनाच मुख्यमंत्री करा; महिला समर्थक धाय मोकलून रडल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची महिला समर्थकांची भेट घेतली. त्यानंतर महिला समर्थकांना अश्रू अनावर झाले. यावेळी चौहान यांनी महिला समर्थकांची समजूत काढून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी अनपेक्षितपणे मोहन यादव यांची निवड करून भाजपने सर्वांना धक्का दिला. दरम्यान, चौहान यांच्या समर्थकांनाही हा मोठा धक्का मानला जात … The post मध्य प्रदेशात मामांनाच मुख्यमंत्री करा; महिला समर्थक धाय मोकलून रडल्या appeared first on पुढारी.
#image_title

मध्य प्रदेशात मामांनाच मुख्यमंत्री करा; महिला समर्थक धाय मोकलून रडल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची महिला समर्थकांची भेट घेतली. त्यानंतर महिला समर्थकांना अश्रू अनावर झाले. यावेळी चौहान यांनी महिला समर्थकांची समजूत काढून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी अनपेक्षितपणे मोहन यादव यांची निवड करून भाजपने सर्वांना धक्का दिला. दरम्यान, चौहान यांच्या समर्थकांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, स्वत:साठी काहीतरी मागण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन, अशी भावूक प्रतिक्रिया चौहान यांनी यावेळी व्यक्त केली.  Shivraj Singh Chouhan
संबंधित बातम्या : 

MP CM Mohan Yadav : मध्यप्रदेशातही भाजपचे धक्कातंत्र: जाणून घ्या नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याविषयी
MP New CM : ‘सभी को राम राम…’ शिवराज सिंह चौहानांचा हात जोडलेला फोटो; ट्विटने खळबळ
MP Election Result 2023 | जनता जनार्दन की जय! मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान पाचव्यांदा CM बनण्याच्या वाटेवर

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवराजसिंह यांनी मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडली. पत्रकार परिषदेत शिवराज सिंह म्हणाले की, मी अत्यंत नम्रतेने एक गोष्ट सांगतो की. स्वत:साठी काहीतरी मागण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन. मी दिल्लीला जाणार नाही, पक्ष जे काम देईल, ते मी करेन. मी कधीही माझ्याबाबत कोणताही निर्णय घेत नाही. जो निर्णय घेईल तो आमचा पक्ष घेईल. Shivraj Singh Chouhan
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 2023 मध्ये पुन्हा एकदा भाजपने प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले आहे, याबाबत मी समाधानी असून माझे मन आनंदाने आणि समाधानाने भरले आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार राज्यात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करेल. प्रगती आणि विकासाच्या बाबतीत मध्य प्रदेश नवीन उंची गाठेल. माझे त्यांना यापुढे सहकार्य राहील, असे चौहान म्हणाले.
मध्‍य प्रदेशचे नवे मुख्‍यमंत्री कोण? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मध्‍य प्रदेशमधील भोपाळ येथील भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मध्य प्रदेशचे मुख्‍यमंत्री म्‍हणून मोहन यादव यांच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब करून भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला. (MP CM Mohan Yadav) मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. आणि शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये ते मंत्री होते. मोहन यादव हे आरएसएसचे अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्या नावाची घोषणा अत्यंत धक्कादायक मानली जात आहे.

#WATCH | Bhopal: Former Madhya Pradesh Chief Minister and senior BJP leader Shivraj Singh Chouhan meets women supporters.
(Source: Shivraj Singh Chouhan’s office) pic.twitter.com/oWlHYUYlpJ
— ANI (@ANI) December 12, 2023

#WATCH | Bhopal: Former Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan says, “I am confident that under the leadership of CM Mohan Yadav, the BJP govt will complete the ongoing projects in the state…In terms of progress and development, Madhya Pradesh will achieve new… pic.twitter.com/3YnYr9s9TC
— ANI (@ANI) December 12, 2023

The post मध्य प्रदेशात मामांनाच मुख्यमंत्री करा; महिला समर्थक धाय मोकलून रडल्या appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची महिला समर्थकांची भेट घेतली. त्यानंतर महिला समर्थकांना अश्रू अनावर झाले. यावेळी चौहान यांनी महिला समर्थकांची समजूत काढून त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी अनपेक्षितपणे मोहन यादव यांची निवड करून भाजपने सर्वांना धक्का दिला. दरम्यान, चौहान यांच्या समर्थकांनाही हा मोठा धक्का मानला जात …

The post मध्य प्रदेशात मामांनाच मुख्यमंत्री करा; महिला समर्थक धाय मोकलून रडल्या appeared first on पुढारी.

Go to Source