Nagar News : टीकाकारांना माझी साखर कडू लागणार : खासदार सुजय विखे
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : माझ्यावर टीका करणार्यांना मी दिलेली साखर कडू लागणार आहे. त्यामुळे अशा लोकांपासून जनतेते सावध राहावे, त्यांचे समाजासाठी सोडाच, पण जवळच्या लोकांसाठी एक रुपयाचे योगदान नाही, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. अकोला येथे विकासकामांचा शुभारंभ व शिधापत्रिकाधारकांना मोफत चार किलो साखर व एक किलो चनाडाळ वाटप खासदार विखे व आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार विखे बोलत होते. भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, अभय आव्हाड, संजय किर्तने, काशिनाथ लवांडे, राहुल राजळे, विष्णूपंत अकोलकर, बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, कुंडलिक आव्हाड, धनंजय बडे, अजय रक्ताटे, संजय बडे, वैभव खलाटे, पांडुरंग लाड, रवींद्र आरोळे उपस्थित होते. खासदार विखे व आमदार राजळे यांची मिरवणूक काढून जेसीबीने फुले टाकून जंगी स्वागत केले. खासदार विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे उभारलेल्या राममंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित होणार आहे.
यादिवशी देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवाळीचा आनंद गोड व्हावा, त्यासाठी आपण दिलेली साखर व डाळीचा प्रभू रामचंद्रांसाठी प्रसाद म्हणून प्रत्येक घरातून दोन लाडू तयार करायचे आहेत. आमदार राजळे म्हणाल्या, निवडणुका जवळ आल्या की विरोधक लोकप्रतिनिधींवर टीका करतात. रस्ते, पाण्यासाठी आंदोलन केले जाते. मात्र, मंजूर रस्त्यासाठीही आंदोलन करून राजकारण करतात. राष्ट्रीय महामार्ग 61 वरील मेहकरी फाटा ते येळी गावापर्यंत रखडलेल्या कामासाठी खासदार विखे यांनी पाठवावा करून ते काम पूर्ण केले.
जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी यासाठी आंदोलन करून लोकांना संभ्रमात टाकण्याचे काम केले. राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत खासदार विखे यांचा पाठपुरावा होता त्यामुळे हा रस्ता झाला, असे सांगत त्यांनी आमदार नीलेश लंके यांना टोला लगावला. राष्ट्रीय महामार्गाच्या उर्वरित रस्त्यांसाठी 16 कोटी रुपये मंजूर केल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.
प्रास्ताविक नारायण पालवे यांनी, तर सूत्रसंचालन उद्धव माने यांनी केले. अॅड. संपत गर्जे यांनी आभार मानले.
बँक व आरोग्य केंद्राची मागणी
अकोला गावात जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेसाठी आमदार राजळे यांनी व राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेसाठी खासदार विखे यांनी प्रयत्न करावेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रही मंजूर करावे, या मागण्याचे निवेदन सरपंच नारायण पालवे यांनी दिले.
भाजपच्या व्यासपीठावर प्रताप ढाकणे
भाजपच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी अचानक एन्ट्री केली. त्यानंतर ढाकणे यांनी खासदार विखे व आमदार राजळे यांचा केलेला सन्मान चर्चेचा विषय ठरला. यावेळी ढाकणे म्हणाले, योगायोगाने मी इथून जात असताना गावात खासदार विखे हे प्रथमच आले. आमदार राजळे या नेहमी येतात, म्हणून त्यांचे स्वागत केले पाहिजे, अकोले गावासाठी खासदार डॉ विखे यांनी भरीव काहीतरी द्यावं, अशी मागणी केली.
हेही वाचा
Nagar News : ..तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार; दुरगाव ग्रामस्थांचे उपोषण
Pune News : खेड तहसील कार्यालयाबाहेरच मरण पत्करू
मुंबई-पुणे मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी आज ब्लॉक
The post Nagar News : टीकाकारांना माझी साखर कडू लागणार : खासदार सुजय विखे appeared first on पुढारी.
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : माझ्यावर टीका करणार्यांना मी दिलेली साखर कडू लागणार आहे. त्यामुळे अशा लोकांपासून जनतेते सावध राहावे, त्यांचे समाजासाठी सोडाच, पण जवळच्या लोकांसाठी एक रुपयाचे योगदान नाही, अशी खरमरीत टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली. अकोला येथे विकासकामांचा शुभारंभ व शिधापत्रिकाधारकांना मोफत चार किलो साखर व एक किलो चनाडाळ वाटप …
The post Nagar News : टीकाकारांना माझी साखर कडू लागणार : खासदार सुजय विखे appeared first on पुढारी.