पुढारी ऑनलाईन डेस्क: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांना खासरदारकी गमवावी लागली आहे. त्यांची लोकसभेतून हकालपट्टी देखील करण्यात आली. यानंतर लोकसभा समितीने महुआ यांना त्यांचा अधिकृत बंगला तत्काळ खाली करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (Mahua Moitra)
तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांची ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणातील आरोपावरून लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली हाेती. काही दिवसांनंतर, संसदेच्या गृहनिर्माण समितीने तृणमूल काँग्रेस नेत्या महुआ यांना त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहिले आहे, असे ‘इंडिया टुडे’ ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Mahua Moitra)
Mahua Moitra: काय आहे ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरण ?
महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती हिरानंदानींकडून पैसे आणि भेटवस्तू घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. या प्रकरणात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर नैतिक आचरण समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. महुआ मोईत्रांचा पुर्वाश्रमीचा प्रियकर जय अनंत देहादराय याच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे खासदार दुबे यांनी तक्रार केली होती.
लोकसभा नैतिक आचरण समितीच्या शिफारशीनुसार कारवाई
उद्योगपती हिरानंदानी यांनीही या प्रकरणात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये महुआ मोईत्रांनी संसदेचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड देखील आपल्याकडे सोपविल्याचे म्हटले होते. नैतिक आचरण समितीला महुआ मोईत्रांवरील आरोप खरे आढळले होते. एवढेच नव्हे तर बंगळुरू, दुबई, अमेरिका येथून महुआ मोईत्रांचे संसदेचे खाते वापरण्यात आल्याचेही आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, हा संसदेच्या सुरक्षेशी निगडीत विषय असल्याने त्यांची खासदारकी रद्द करावी अशी शिफारस समितीने केली होती. यानुसार, लोकसभेच्या नैतिक आचरण समितीच्या शिफारशींच्या आधारे महुआ मोईत्रांना अपात्र ठरविण्याचा निर्णय मागील आठवड्यात लोकसभेत झाला होता. यानंतर महुआ यांची खासदारकी रद्द झाली होते. त्यामुळे त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
अपात्रताविरुद्ध महुआंची सर्वोच्च न्यायालयात धाव
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या अपात्र ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. लोकसभेच्या नैतिक आचरण समितीच्या शिफारशींच्या आधारे महुआ मोईत्रांना अपात्र ठरविण्याचा निर्णय मागील आठवड्यात लोकसभेत झाला होता. या साऱ्या घटनाक्रमानंतर महुआ मोईत्रा यांनी अपात्रतेविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचे संकेत दिले होते. त्यापार्श्वभूमीवर आज त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्याला अपात्र ठरविण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे महुआ मोईत्रांनी याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा:
Mahua Moitra: अपात्रताविरुद्ध महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
Mahua Moitra TMC | तृणमूल खासदार महुआ मोइत्रांच्या हकालपट्टीनंतर विरोधक नाराज
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवले: तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी
The post ‘बंगला तत्काळ खाली करा’, महुआ मोईत्रांना आदेश appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांना खासरदारकी गमवावी लागली आहे. त्यांची लोकसभेतून हकालपट्टी देखील करण्यात आली. यानंतर लोकसभा समितीने महुआ यांना त्यांचा अधिकृत बंगला तत्काळ खाली करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (Mahua Moitra) तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांची ‘कॅश फॉर क्वेरी’ …
The post ‘बंगला तत्काळ खाली करा’, महुआ मोईत्रांना आदेश appeared first on पुढारी.