Accident : आळेफाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : मालवाहतूक करणार्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद येथील बाह्यवळण पुलाजवळ रविवारी (दि. 10) दुपारी 12 च्या सुमारास झाला.
सुनील जिजाबा कोरडे (वय 45, रा. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव बाजूकडून बाह्यवळण रस्त्याने सुनील कोरडे हे दुचाकीवरून (एमएच 14 ईजे 443) आळेफाटा बाजूकडे वळत होते.
या वेळी नगर-कल्याण महामार्गाने ओतूरहून आळेफाट्याकडे येत असलेल्या ट्रकने (एमएच 14 जीयू 7650) कोरडेंना जोरात धडक दिली. यामध्ये कोरडे गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात धडक देणार्या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भीमा लोंढे हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
मुख्यमंत्र्यांनी रचला माझ्यावरील हल्ल्याचा कट : केरळच्या राज्यपालांचा आरोप
Sushma Andhare : फडणवीसांनी सुरु केलेला खेळ उद्धव ठाकरे संपवतील : सुषमा अंधारे
आहारातील कांद्याचा वापर चार हजार वर्षांपासून!
The post Accident : आळेफाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.
आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : मालवाहतूक करणार्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद येथील बाह्यवळण पुलाजवळ रविवारी (दि. 10) दुपारी 12 च्या सुमारास झाला. सुनील जिजाबा कोरडे (वय 45, रा. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारगाव बाजूकडून बाह्यवळण रस्त्याने …
The post Accident : आळेफाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.