पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शरद पवारांचा ८3 वाढदिवस ते ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. शरद पवारांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ‘काटेवाडी’ या छोट्याशा गावातील गोविंदराव आणि शारदाबाई या दाम्पत्यापोटी 12 डिसेंबर 1940 झाला. काटेवाडी ते मंत्रालय या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक अनेक पदाभार सांभाळले. एका कॉलेजचा जीएस (General Secratery) ते केंद्रीयमंत्र्यापर्यंतचा प्रवास आहे. आतापर्यंत ते महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. वयाची ८३ (Sharad Pawar Birthday) गाठलेल्या हा माणूस आजही राजकारणात सक्रीय आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मुलगी, खासदार सुप्रिया सुळे यांनी भावनिक पोस्ट करत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.” (Sharad Pawar Birthday)
फोटो : खासदार सुप्रिया सुळे यांच्या ‘X’ अकाउंटवरुन घेण्यात आला आहे.
Sharad Pawar Birthday : प्रिय बाबा,लोक तुमचे सांगाती आणि…
“आधी लढाई जनहिताची !!! प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती. मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत. कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे. आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय. संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !”
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा , आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती.
मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण… pic.twitter.com/IJvh46iMyv
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2023
हेही वाचा
Sharad Pawar Birthday : शरद पवारांचे ‘ते’ भाषण ठरलं ऐतिहासिक, बदलले होते निवडणुकीचे ‘वारे’
धो धो पावसात शरद पवारांचं भाषण; व्हिडिओ व्हायरल
Glenn Maxwell & Sharad Pawar : “मैदान क्रिकेटचं असो की राजकीय…” : रोहित पवारांची सूचक पोस्ट
Sharad Pawar Resignation Speech …मी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे : शरद पवार यांचे संपूर्ण भाषण
The post ‘लढेंगे-जितेंगे…’ : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शरद पवारांचा ८3 वाढदिवस ते ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. शरद पवारांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील ‘काटेवाडी’ या छोट्याशा गावातील गोविंदराव आणि शारदाबाई या दाम्पत्यापोटी 12 डिसेंबर 1940 झाला. काटेवाडी ते मंत्रालय या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक अनेक पदाभार सांभाळले. एका कॉलेजचा जीएस (General Secratery) ते केंद्रीयमंत्र्यापर्यंतचा प्रवास आहे. आतापर्यंत ते …
The post ‘लढेंगे-जितेंगे…’ : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट appeared first on पुढारी.