मुख्यमंत्र्यांनी रचला माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट : केरळच्‍या राज्‍यपालांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तिरुअनंतपुरम विमानतळाकडे जाताना सोमवारी (दि.११) सायंकाळी केरळचे राज्‍यपाल ( Kerala governor) आरिफ मोहम्‍मद खान ( Arif Mohammed Khan) यांना ‘एसएफआय’च्‍या कार्यकर्त्यांनी ( SFI activists ) काळे झेंडे दाखवले. त्‍यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न करताना दुचाकीने त्‍यांच्‍या वाहनाला धडक दिली. या प्रकाराबाबत राज्‍यपालांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला असून, केरळच्‍या मुख्यमंत्र्यांनी माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट रचला, … The post मुख्यमंत्र्यांनी रचला माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट : केरळच्‍या राज्‍यपालांचा आरोप appeared first on पुढारी.
#image_title

मुख्यमंत्र्यांनी रचला माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट : केरळच्‍या राज्‍यपालांचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तिरुअनंतपुरम विमानतळाकडे जाताना सोमवारी (दि.११) सायंकाळी केरळचे राज्‍यपाल ( Kerala governor) आरिफ मोहम्‍मद खान ( Arif Mohammed Khan) यांना ‘एसएफआय’च्‍या कार्यकर्त्यांनी ( SFI activists ) काळे झेंडे दाखवले. त्‍यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न करताना दुचाकीने त्‍यांच्‍या वाहनाला धडक दिली. या प्रकाराबाबत राज्‍यपालांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला असून, केरळच्‍या मुख्यमंत्र्यांनी माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट रचला, असा आरोप आरिफ यांनी केला आहे.
लोकशाहीमध्‍ये हा कसला निषेधाचा मार्ग ?
“त्यांनी माझ्या गाडीला धडक दिली. हा लोकशाही निषेधाचा मार्ग आहे का? अशा प्रकारे निषेध करणार्‍यांना मुख्यमंत्र्यांच्या वाहनाजवळ जाऊ देण्‍यात येईल का, असा सवाल केरळच्‍या राज्‍यपालांनी केला आहे. तसेच “मुख्यमंत्र्यांनी मला शारीरिक इजा करण्याचा हा कट रचला आहे, असा आरोपही केला.
नेमकं काय घडलं होतं?
राज्यपाल आरिफ सोमवारी नवी दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पकडण्यासाठी जात होते. सायंकाळी सातच्या सुमारास केरळ विद्यापीठाच्या लायब्ररीजवळ एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी प्रथम त्याच्यावर काळे झेंडे फडकावले. यानंतर एक दुचाकीस्‍वाराने राज्यपालांच्या वाहनाला धडक दिली. यानंतर दुचाकीस्‍वार पसार झाला. राज्यपालांनी आपली गाडी पेट्टा येथे थांबवली. “मी तिरुअनंतपुरमच्या रस्त्यांवर गुंडांचे राज्य होऊ देणार नाही”, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर राज्‍यपाल विमानतळाकडे रवाना झाले. शहर पोलीस आयुक्त सी एच नागराजू यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांच्या वाहनाला मारहाण करणाऱ्या सात जणांसह १९ एसएफआय कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : 

Sushma Andhare : फडणवीसांनी सुरु केलेला खेळ उद्धव ठाकरे संपवतील : सुषमा अंधारे
Article 370 Verdict : ३७० रद्द करणे झाला इतिहास, आता वेळ पाकव्याप्त काश्मीरला मुक्त करण्याची : विहिंप नेते आलोक कुमार

 
 
The post मुख्यमंत्र्यांनी रचला माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट : केरळच्‍या राज्‍यपालांचा आरोप appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तिरुअनंतपुरम विमानतळाकडे जाताना सोमवारी (दि.११) सायंकाळी केरळचे राज्‍यपाल ( Kerala governor) आरिफ मोहम्‍मद खान ( Arif Mohammed Khan) यांना ‘एसएफआय’च्‍या कार्यकर्त्यांनी ( SFI activists ) काळे झेंडे दाखवले. त्‍यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न करताना दुचाकीने त्‍यांच्‍या वाहनाला धडक दिली. या प्रकाराबाबत राज्‍यपालांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला असून, केरळच्‍या मुख्यमंत्र्यांनी माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट रचला, …

The post मुख्यमंत्र्यांनी रचला माझ्‍यावरील हल्‍ल्‍याचा कट : केरळच्‍या राज्‍यपालांचा आरोप appeared first on पुढारी.

Go to Source