कस्तुरी : ठसकेबाज लावण्या, कलाकारांशी गप्पा अन् गाणी
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिलखुलास गप्पा, रिल्स, गाणी, नृत्य… अशा विविध गोष्टींचा आनंद ‘महाराष्ट्राची शान… मराठमोळी लावणी’ या दर्जेदार कार्यक्रमातून महिलांना घेता घेणार आहे. ‘दै. पुढारी कस्तुरी क्लब’ आयोजित आणि सोनी मराठी प्रस्तुत या कार्यक्रमात सोनी मराठी वाहिनीवरील कलाकारांना भेटण्याची संधीही मिळणार आहे. शुक्रवारी (दि. 15) हा अस्सल लावण्यांचा कार्यक्रम आयोजिला असून, त्यात लावणी कलाकार मंजू वाघमारे आणि सहकारी बहारदार लावण्या सादर करतील. सहकारनगर येथील पुणे विद्यार्थीगृहाच्या मुक्तांगण शाळेच्या सभागृहात सायंकाळी चार ते सात या वेळेत हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी विनामूल्य आयोजित केला आहे.
यानिमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेतील राजवीरची भूमिका करणारे अजिंक्य राऊत आणि मयूरीची भूमिका करणार्या जान्हवी तांबट, ‘खरंच तिचं काय चुकलं?’ या मालिकेतील आभाची भूमिका करणार्या ज्योती निमसे, कुहूची भूमिका करणार्या भाग्यश्री दळवी आणि श्रेयसची भूमिका करणारे रोशन विचारे महिलांच्या भेटीला येणार आहेत. तर ‘इंडियन आयडॉल मराठी’तील गायिका भाग्यश्री टिकले आणि देवश्री मनोहर हेही विविध सुरेल गीते सादर करतील. या वेळी लकी ड्रॉही काढण्यात येणार असून, कार्यक्रमाला येणार्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. मेघना झुझम या कार्यक्रमाचे निवेदन करतील.
प्रत्येक महिलेला मिळणार भेटवस्तू
डॉ. गिरिजा पाटील ब्रे स्ट सर्जन, नोबल मंगल दीप कॅन्सर फाउंडेशन, धनश्री कुलकर्णी फिरस्ती टुर्स प्रायव्हेट लिमिटेड, छाया पांचाळ मॅनेजिंग डायरेक्टर जिनियस ग्रुप आणि सुनंदा डेरे यांच्या वतीने कार्यक्रमाला येणार्या प्रत्येक महिलेला भेटवस्तू मिळणार आहेत.
महिलांसाठी विनामूल्य कार्यक्रम
केवळ महिलांसाठी हा कार्यक्रम असून, विनामूल्य प्रवेशिकांसाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेशिकांसाठी 7972252835/7776911730/8600402323 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कधी – शुक्रवारी, 15 डिसेंबर
कुठे – पुणे विद्यार्थीगृहाचे मुक्तांगण शाळेतील सभागृह, सहकारनगर
वेळ – सायंकाळी चार ते सात
हेही वाचा
शरीरासाठी लाभदायक ठरतात रव्याचे पदार्थ
हॅलेच्या धूमकेतूने सुरू केला परतीचा प्रवास
Pune News : धनकवडीत पडला अतिक्रमणांवर हातोडा
The post कस्तुरी : ठसकेबाज लावण्या, कलाकारांशी गप्पा अन् गाणी appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिलखुलास गप्पा, रिल्स, गाणी, नृत्य… अशा विविध गोष्टींचा आनंद ‘महाराष्ट्राची शान… मराठमोळी लावणी’ या दर्जेदार कार्यक्रमातून महिलांना घेता घेणार आहे. ‘दै. पुढारी कस्तुरी क्लब’ आयोजित आणि सोनी मराठी प्रस्तुत या कार्यक्रमात सोनी मराठी वाहिनीवरील कलाकारांना भेटण्याची संधीही मिळणार आहे. शुक्रवारी (दि. 15) हा अस्सल लावण्यांचा कार्यक्रम आयोजिला असून, त्यात लावणी …
The post कस्तुरी : ठसकेबाज लावण्या, कलाकारांशी गप्पा अन् गाणी appeared first on पुढारी.