शरीरासाठी लाभदायक ठरतात रव्याचे पदार्थ
नवी दिल्ली : शिरा असो किंवा उप्पीट, डोसा असो किंवा उत्ताप्पा, नाश्त्याचे अनेक पदार्थ रव्यापासून बनवले जात असतात. हा रवा स्वादिष्ट नाश्त्यासाठीच उपयुक्त आहे असे नव्हे तर तो आरोग्यासाठीही लाभदायक ठरतो, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे.
रवा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त पदार्थ आहे. तो अनेक पौष्टिक तत्त्वांनी समृद्ध आहे. रवा प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांचा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन अ आणि डी भरपूर प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक तत्त्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रवा हा मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे. याचे कारण म्हणजे रवा मॅग्नेशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. जे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करतात.
आहारात रव्याचा वापर केल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत कार्य करण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टळतो. रव्यात आयर्नची भरपूर मात्रा आढळल्यामुळे हे शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. रव्याच्या नियमित सेवनाने हाडांचे आरोग्य सुधारते. रवा हाडे, मज्जातंतू आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करते. हाडे आणि सांध्यांच्या मजबुतीसाठी रव्याचे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. फायबरने समृद्ध असलेल्या रव्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.
The post शरीरासाठी लाभदायक ठरतात रव्याचे पदार्थ appeared first on पुढारी.
नवी दिल्ली : शिरा असो किंवा उप्पीट, डोसा असो किंवा उत्ताप्पा, नाश्त्याचे अनेक पदार्थ रव्यापासून बनवले जात असतात. हा रवा स्वादिष्ट नाश्त्यासाठीच उपयुक्त आहे असे नव्हे तर तो आरोग्यासाठीही लाभदायक ठरतो, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. रवा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त पदार्थ आहे. तो अनेक पौष्टिक तत्त्वांनी समृद्ध आहे. रवा प्रोटिन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यांचा …
The post शरीरासाठी लाभदायक ठरतात रव्याचे पदार्थ appeared first on पुढारी.