सातारा : सुरक्षा रक्षकांची सांगली वारी थांबणार
विशाल गुजर
सातारा : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र कामगार भवन आणि सुरक्षा रक्षक मंडळ कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. यासाठी सातारा औद्योगिक वसाहतीतील सरकारी दूध संघाची साडेसात एकर जागा निश्चित झाली आहे. सध्या सहायक कामगार कार्यालयात हे कार्यालय सुरु होणार असून एकूण 14 पदेही मंजूर झाली आहेत. नवीन कार्यालय सुरू झाल्याने कामगारांची सांगली वारी थांबणार आहे.
कामगारमंत्री आ. सुरेश खाडे यांनी सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक मंडळ कार्यालय व स्वतंत्र कामगार भवन आणि त्याच परिसरामध्ये ईएसआय हॉस्पिटल उभारण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. याकरिता काही जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. या कार्यालयांच्या संदर्भातील कामांचे प्रस्ताव अंतिम झाला असून, लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार आहे.
सुरक्षा रक्षकांच्या नेमणुका सुरक्षा मंडळाकडून होणार आहे. या मंडळाचे अध्यक्ष हे सहायक कामगार आयुक्त असणार आहे. खासगी सुरक्षारक्षकांची मक्तेदारी आणि त्या माध्यमातून मध्यस्तांची बोकाळलेली दलाली याला प्रतिबंध बसणार आहे. याचबरोबर मध्यस्थामार्फत सुरक्षा रक्षकांचे पगार न होता ते थेट सुरक्षा मंडळ आणि कामगार आयुक्त कार्यालय यांच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांच्या खात्यावर जमा होणार आहेत. जिल्ह्यातील 295 कर्मचार्यांना याचा फायदा होणार आहे.
अशी आहेत पदे…
सुरक्षा रक्षक महामंडळात पूर्वी अध्यक्ष आणि सचिव ही दोनच पदे मंजूर होती. सध्या अध्यक्ष 1, सचिव 1, कार्मिक अधिकारी 1, निरीक्षक 2, लेखापाल 1, राउंडर 1, वरिष्ठ लिपिक 1, लिपिक टंकलेखक 4, वाहन चालक 1, शिपाई 1 अशी एकूण 14 पदे मंजूर झाली आहेत.
42 टक्के लेव्ही
कंपनी मालकांनी कामगारांच्या पगाराशिवाय 42 टक्के लेव्ही सुरक्षा रक्षक महामंडळात भरणे आवश्यक आहे. लेव्हीमध्ये भविष्य निर्वाह निधी 12 टक्के, सानुग्रह अनुदान 8.33 टक्के, उपदान 4 टक्के, पगारी रजा 3 टक्के, पगारी सुट्टी 1 टक्के, कामगार राज्य विमा 3.25 टक्के, प्रशासकीय निधी 5 टक्के, गणवेश 4.50 टक्के तर गंगाजळी 0. 92 टक्के अशा 42 टक्के लेव्ही भरावा लागत आहे.
The post सातारा : सुरक्षा रक्षकांची सांगली वारी थांबणार appeared first on पुढारी.
सातारा : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र कामगार भवन आणि सुरक्षा रक्षक मंडळ कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. यासाठी सातारा औद्योगिक वसाहतीतील सरकारी दूध संघाची साडेसात एकर जागा निश्चित झाली आहे. सध्या सहायक कामगार कार्यालयात हे कार्यालय सुरु होणार असून एकूण 14 पदेही मंजूर झाली आहेत. नवीन कार्यालय सुरू झाल्याने कामगारांची सांगली वारी थांबणार आहे. कामगारमंत्री आ. …
The post सातारा : सुरक्षा रक्षकांची सांगली वारी थांबणार appeared first on पुढारी.