पूरन, होल्डर, मेयर्सने नाकारला केंद्रीय करार
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जून-जुलै महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार निकोलस पूरन, जेसन होल्डर आणि काइल मेयर्स या खेळाडूंनी केंद्रीय करार नाकारला आहे. याचा अर्थ ते यापुढे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचा त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा हक्क नसेल. या खेळाडूंना जर खेळायचे असेल तर ते खेळातील, अन्यथा स्वतःच्या मर्जीने ते खेळणारही नाहीत.
वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी सर्वजण उत्सुक आहेत, पण यजमान देश वेस्ट इंडिज दीर्घकाळापासून सतत क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. विंडीजचा संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी आणि 2023 च्या वन-डे विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. मात्र, यजमान असल्यामुळे वेस्ट इंडिजने आगामी टी-20 विश्वचषकासाठी आधीच पात्रता मिळवली आहे, पण यामुळे त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. होल्डर, पूरन आणि मेयर्स आता विंडीजसाठी फार कमी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने तिन्ही खेळाडूंच्या निर्णयाचा आदर केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत मात्र खेळणार
शाय होपच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने 25 वर्षांनंतर त्यांच्याच भूमीवर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. 1998 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. त्यानंतर आजपासून दोन्ही संघामध्ये टी-20 मालिका रंगणार आहे. यासाठी निवडण्यात आलेल्या संघात होल्डर, पूरन आणि मेयर्स या तिघांना निवडण्यात आले आहे.
The post पूरन, होल्डर, मेयर्सने नाकारला केंद्रीय करार appeared first on पुढारी.
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जून-जुलै महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार निकोलस पूरन, जेसन होल्डर आणि काइल मेयर्स या खेळाडूंनी केंद्रीय करार नाकारला आहे. याचा अर्थ ते यापुढे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचा त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा हक्क नसेल. या खेळाडूंना जर …
The post पूरन, होल्डर, मेयर्सने नाकारला केंद्रीय करार appeared first on पुढारी.