शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम, निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर
पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक भांडवली बाजारांमधील मिळणारे सकारात्मक संकेतामुळे आज ( दि. १२ डिसेंबर) आठवड्याच्या सलग दुसर्या दिवशीच्या प्रारंभी शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम राहिली. निर्देशांकांनी मंगळवारी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 21,031 ची पातळी गाठली. सेन्सेक्स 48.05 अंकांच्या किंवा 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 69,976.58 च्या पातळीवर व्यवहार करत होता. याआधी सोमवारी बीएसई सेन्सेक्सने 102 अंकांची उसळी घेतली आणि 69,928 वर बंद झाला.
बाजाराची सुरुवात तेजीने
आज बाजाराची सुरुवात तेजीने झाली आहे. निफ्टी 21000 च्या वर उघडला आहे. सेन्सेक्स 48.05 अंकांच्या किंवा 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 69,976.58 च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 21.70 अंकांच्या किंवा 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 21,018.80 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
मेटल, फार्मा आणि पीएसयू बँकिंग समभागांनी बाजार वाढण्यास हातभार लावला आहे. याशिवाय विमा क्षेत्रातही मजबूत वाढ नोंदवली जात आहे. एसबीआय लाइफ आणि एचडीएफसी लाइफ निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढल्याचे दिसले. खरेदीदारांचा उत्साह पाहता बाजारात पुन्हा नव्या विक्रमाच्या नाेंदीकडे वाटचाल सुरु असल्याचे स्पष्ट हाेत आहे.
‘सीएफओ’च्या राजीनाम्यामुळे इन्फोसिसच्या शेअर्स विक्रीत वाढ
आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) निलांजन रॉय यांच्या राजीनाम्याचा परिणाम शेअर्सवरही दिसून येत आहे. निलांजन यांच्यानंतर १ एप्रिलपासून जयेश संघराजका या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. निलांजन यांच्यानंतर १ एप्रिलपासून जयेश संघराजका या पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. मात्र, नवीन सीएफओच्या नावाची घोषणाही सध्या शेअर्स हाताळण्यास सक्षम नाही. सुरुवातीच्या व्यापारात, त्याचे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक घसरून 1468.50 रुपयांवर आले.
The post शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम, निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक भांडवली बाजारांमधील मिळणारे सकारात्मक संकेतामुळे आज ( दि. १२ डिसेंबर) आठवड्याच्या सलग दुसर्या दिवशीच्या प्रारंभी शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम राहिली. निर्देशांकांनी मंगळवारी नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 21,031 ची पातळी गाठली. सेन्सेक्स 48.05 अंकांच्या किंवा 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 69,976.58 च्या पातळीवर व्यवहार करत होता. याआधी सोमवारी बीएसई सेन्सेक्सने …
The post शेअर बाजारात तेजीची घोडदौड कायम, निफ्टी सार्वकालिक उच्चांकावर appeared first on पुढारी.