तडका : नोटाच नोटा चोहीकडे!

सध्या देशभरात एकाच व्यक्तीचा बोलबाला आहे आणि त्यांचे नाव आहे खासदार धीरज साहू. हे साहू महोदय काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील प्रतिनिधी आहेत. केंद्रीय यंत्रणांना श्रीमान साहू यांच्या डिस्टिलरी, म्हणजेच मद्यनिर्मिती कारखान्यांमधून खूप काळा पैसा जमा होत असून, तो त्यांनी लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. या यंत्रणांनी त्यांच्या ओडिशा, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये असलेल्या या कारखान्यांवर छापे … The post तडका : नोटाच नोटा चोहीकडे! appeared first on पुढारी.
#image_title

तडका : नोटाच नोटा चोहीकडे!

सध्या देशभरात एकाच व्यक्तीचा बोलबाला आहे आणि त्यांचे नाव आहे खासदार धीरज साहू. हे साहू महोदय काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील प्रतिनिधी आहेत. केंद्रीय यंत्रणांना श्रीमान साहू यांच्या डिस्टिलरी, म्हणजेच मद्यनिर्मिती कारखान्यांमधून खूप काळा पैसा जमा होत असून, तो त्यांनी लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. या यंत्रणांनी त्यांच्या ओडिशा, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये असलेल्या या कारखान्यांवर छापे टाकले. त्यापैकी एका ठिकाणच्या छाप्यामध्ये नगदीमध्ये अमाप शब्दही अपुरा पडेल इतक्या नोटा आढळून आल्या आहेत. ज्यांचा कुठलाच हिशेब साहू यांच्याकडे नाही. नोटांनी भरलेल्या अनेक आलमार्‍या/कपाटे पाहून तपासणी अधिकार्‍यांचेसुद्धा डोळे फिरण्याची वेळ आली. शेवटी चार बँकांना या नोटा मोजण्याचे काम देण्यात आले. त्या बँकांचे कर्मचारी आणि नोटा मोजणार्‍या मशिनसुद्धा थकून गेल्या. हे काम एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे, तर तब्बल एक आठवडाभर सुरू आहे. यादरम्यान एकूण तीन मशिन साहूंच्या नोटा मोजताना बिघडल्या आणि बंद पडल्या. तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिकची कॅश त्या ठिकाणी आढळून आली आणि त्याचा तपास अद्यापही सुरू आहे. हा सारा काळा पैसा असून, तो जमा करणार्‍या साहू यांनी तो धीरे धीरे नव्हे, तर अत्यंत धीर ठेवून जमा करून ठेवलेला आहे, असे दिसून आले आहे.
साहू किती तुझा अपराध म्हणजे सहन करू किती तुझा अपराध, असे म्हणण्याची देशावर वेळ आली आहे. दरम्यान, सर्व खासदार कुठे ना कुठे सोशल मीडियावर सक्रिय असतात. संबंधित साहू महोदयांचे ट्विटर अकाऊंट तपासले असता, एक आश्चर्यकारक ट्विट जे त्यांनी एक वर्षापूर्वी केले तेथे दिसून आले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, नोटाबंदीनंतरही लोक कसा काय अजूनही काळा पैसा जमा करतात? म्हणजे जमा होणार्‍या काळ्या पैशांबद्दल त्या गृहस्थांनी आश्चर्य व्यक्त केलेले या ट्विटमध्ये दिसून येते. तसेच इंटरनेटवर इंधन बचत करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी साहू महोदय स्वतःच्या कार्यालयात सायकलवर जातानाचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. याला आपल्या साध्यासुध्या मराठीत ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हणतात. म्हणजेच चोरानेच दिवसा ओरड करायची की, चोर फार माजलेत, पोलिस यंत्रणाचा धाक उरलेला नाही, रात्रीची गस्त वाढवली पाहिजे आणि दिवसा ओरड करणार्‍या या चोरानेच रात्रीच्या वेळेला लोकांच्या घरी दरोडे टाकायचे, असा काहीसा प्रकार साहू यांनी केलेला आहे.
पहिले म्हणजे, राज्यसभेचे खासदार हे पक्ष नियुक्त असतात. ते कुठलीही थेट निवडणूक लढवत नाहीत. पक्षाच्या तिजोरीमध्ये काही कोटी किंवा काहीशे कोटी टाकले की, राज्यसभेची खासदारकी मिळते म्हणे. सदरील साहू महोदयांनी आपल्या पक्षाला किती निधी दिला आहे, याविषयीची बातमी कधीच बाहेर येणार नाही; कारण हा निधी या कपाटामध्ये भरलेल्या रोख रकमेमधूनच दिला गेला असणार, याविषयी आता कुणाच्या मनात शंका उरलेली नाही. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये काळा पैसा गोळा करणार्‍या, तो साठवून ठेवणार्‍या देशाच्या धीरज साहू नावाच्या या खासदाराला आपण सर्वात प्रथम वंदन करूयात. देश महासत्ता होवो की न होवो, देशाच्या पर्यावरणाची काय लागेल ती वाट लागो; पण श्रीमान साहू यांनी मात्र कुबेरालाही लाजवेल एवढी संपत्ती जमा केली आहे, अशा चतुर खासदारांना अर्थमंत्रिपद देऊन त्यांच्या या कौशल्याचा उपयोग इतर देशांची संपत्ती आपल्याकडे वळवण्यामध्ये करून घेतला पाहिजे.
– बोलबच्चन
The post तडका : नोटाच नोटा चोहीकडे! appeared first on पुढारी.

सध्या देशभरात एकाच व्यक्तीचा बोलबाला आहे आणि त्यांचे नाव आहे खासदार धीरज साहू. हे साहू महोदय काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील प्रतिनिधी आहेत. केंद्रीय यंत्रणांना श्रीमान साहू यांच्या डिस्टिलरी, म्हणजेच मद्यनिर्मिती कारखान्यांमधून खूप काळा पैसा जमा होत असून, तो त्यांनी लपवून ठेवला असल्याची माहिती मिळाली. या यंत्रणांनी त्यांच्या ओडिशा, झारखंड आणि इतर राज्यांमध्ये असलेल्या या कारखान्यांवर छापे …

The post तडका : नोटाच नोटा चोहीकडे! appeared first on पुढारी.

Go to Source