सहकार पॅनलची माघार तरीही ‘नामको’त निवडणुकीचा बार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि नासिक मर्चंन्ट को. ऑप. बँकेत निवडणूकीचा बार की बिनविरोधीचा गुलाल या प्रश्नावर अखेर पडदा पडला आहे. बिनविरोधसाठी कसोशीने प्रयत्न करून देखील निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिस्पर्धी ‘सहकार’ पॅनलच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानंतरही निवडणूक होत असल्याने सभासदांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्ताधारी प्रगती पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी माघारीसाठी दिवसभर प्रयत्न … The post सहकार पॅनलची माघार तरीही ‘नामको’त निवडणुकीचा बार appeared first on पुढारी.
#image_title
सहकार पॅनलची माघार तरीही ‘नामको’त निवडणुकीचा बार


नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि नासिक मर्चंन्ट को. ऑप. बँकेत निवडणूकीचा बार की बिनविरोधीचा गुलाल या प्रश्नावर अखेर पडदा पडला आहे. बिनविरोधसाठी कसोशीने प्रयत्न करून देखील निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिस्पर्धी ‘सहकार’ पॅनलच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानंतरही निवडणूक होत असल्याने सभासदांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्ताधारी प्रगती पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी माघारीसाठी दिवसभर प्रयत्न करून देखील काही उमेदवारांची मनधरणी करण्यात अपयश आल्याने, बिनविरोध निवडणुकीच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. दरम्यान, महिला राखीवमधील दोन्ही जागा बिनविरोध करण्यात यश आले असून, सर्वसाधारण गटातील १८ जागांसाठी २४ उमेदवार तर अनुसूचित जाती-जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत. (NAMCO Bank Election)
१ लाख ८८ हजारांपेक्षा अधिक सभासद संख्या असलेल्या नामको बँकेच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सोमवारी (दि.११) अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने, निवडणूकीचे काय चित्र असेल याबाबत उत्सुकता लागून होती. तब्बल १७८ सभासदांकडून २७२ उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, माघारीच्या अखेरच्या दिवशी चांगलेच नाट्य बघावयास मिळाले. शहर, जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे हेवीवेट नेते बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात सकाळपासूनच ठाण मांडून होते. उमेदवारांना आणणे, मनधरणी करणे, तडजोडीची बोलणी असे प्रकार दिसून आले. दुपारनंतर घडामोडींना अधिकच वेग आला. त्यातच विरोधी सहकार पॅनलच्या काही उमेदवारांना गेल्या पंचवार्षिकप्रमाणे यंदाही गळाला लावण्यात यश आल्याने, पॅनलचा ढाचा कोसळल्याचे दिसून आले. परिणामी पॅनलचे प्रमुख नेते गजानन शेलार यांनी देखील उर्वरीत उमेदवारांसह माघार घेतली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र असतानाच याचिकाकर्ते संदीप भवर यांच्यासह जेमतेम उमेदवारांनी अर्ज माघार घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याने नामकोत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.
गिते-गितेंमध्ये अखेर दिलजमाई
प्रगती पॅनलमधून गणेश गिते यांच्यासह दिगंबर गिते इच्छुक असल्याने, दोघांपैकी कोण माघार घेणार यावरून चांगलेच नाट्य रंगले. दिगंबर गिते यांनी गेल्या पंचवार्षिकला माघार घेत गणेश गिते यांना संधी दिली होती. त्यामुळे यंदा गणेश गिते यांनी माघार घ्यावी, अशी दिगंबर गिते यांची इच्छा होती. दोघांमध्ये बराच काळ यावर चर्चाही रंगली. अखेर प्रगती पॅनलच्या नेत्यांनी मध्यस्थी करीत दोघांमध्ये समेट घडवून आणत दिगंबर गिते यांनी माघार घेतली.
प्रशांत दिवे बिनविरोध होता होता राहिले
अनुसूचित जाती-जमाती गटात अखेरीस प्रशांत दिवे आणि विलास जाधव यांचेच अर्ज होते. विलास जाधव यांनी अर्ज माघारीची तयारी दर्शविली. त्यानुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रशांत दिवे आणि विलास जाधव निवडणूक कक्षात पोहोचले. मात्र, गजानन शेलार यांच्या कार्यकर्त्यांनी आता माघार घेता येणार नाही. माघारीचा अवधी संपला असे म्हणत विरोध दर्शविला. यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती. पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, विलास जाधव यांना माघार घेता न आल्याने, प्रशांत दिवे बिनविरोध होता होता राहिले.
प्रगतीमध्ये यांना संधी
उमेदवारीसाठी सुरुवातीपासूनच चढाओढ असलेल्या प्रगती पॅनलमध्ये काही फेरबदल केल्याचे दिसून आले. बागमार कुटुंबात सपना बागमार यांना संधी देण्यात आली. त्याचबरोबर ॲड. आकाश छाजेड, ललितकुमार मोदी यांना संधी देण्यात आली आहे.
प्रगती पॅनलचे उमेदवार जाहीर
सर्वसाधारण गट- वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक, विजय साने, अविनाश गोठी, नरेंद्र पवार, ललितकुमार मोदी, अशोक सोनजे, गणेश गिते, महेंद्र बुरड, सुभाष नहार, प्रफुल्ल संचेती, रंजन ठाकरे, हरीष लोढा, ॲड. आकाश छाजेड, भानुदास चौधरी, प्रकाश दायमा, देवेंद्र पटेल. महिला राखीव- सपना बागमार, शीतल भट्टड (बिनविरोध) तर अनुसूचित जाती-जमाती गटातून प्रशांत दिवे मैदानात आहेत.
‘सहकार’च्या या उमेदवारांच्या माघारी
सर्वसाधारण गट – गजानन शेलार, समीर शेटे, अक्षय कलंत्री, पुरुषोत्तम कडलग, संतोष कदम, संजय मंडलिक, छबु नागरे, लक्ष्मीकांत कोठावदे, संदीप मंडलेचा, विजय कानडे, कमलेश बोडके, प्रवीण नागरे, अशोक पाटील, महेंद्र गांगुर्डे, बाळासाहेब जाधव, हेमंत आमले. महिला राखीव- अश्विनी आमले, सरला जाधव, सोनाली मंडलेचा तर अनुसूचित जाती-जमातीमधून गजानन भालावी यांनी माघार घेतली.
हे अपक्ष उमेदवार मैदानात
सर्वसाधारण गट – संदीप भवर, संजय नेरकर, विजय बोरा, कपिलदेव शर्मा, सुधाकर जाधव, वसंत गांगुर्डे. अनुसूचित जाती-जमाती विलास जाधव.
हेही वाचा :

Vrinda Dinesh : आईसाठी ‘ड्रीम कार’ गिफ्ट देणार
मातामृत्यूमध्ये राज्य दुसर्‍या क्रमांकावर
मातामृत्यूमध्ये राज्य दुसर्‍या क्रमांकावर

The post सहकार पॅनलची माघार तरीही ‘नामको’त निवडणुकीचा बार appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दि नासिक मर्चंन्ट को. ऑप. बँकेत निवडणूकीचा बार की बिनविरोधीचा गुलाल या प्रश्नावर अखेर पडदा पडला आहे. बिनविरोधसाठी कसोशीने प्रयत्न करून देखील निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिस्पर्धी ‘सहकार’ पॅनलच्या सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यानंतरही निवडणूक होत असल्याने सभासदांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सत्ताधारी प्रगती पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी माघारीसाठी दिवसभर प्रयत्न …

The post सहकार पॅनलची माघार तरीही ‘नामको’त निवडणुकीचा बार appeared first on पुढारी.

Go to Source