सातारा : ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरील दोघांचा मृत्यू

लिंब; पुढारी वृत्तसेवा : ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी लोणंदमध्ये ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने एकाला उडवले होते. यानंतर सोमवारी रात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे ट्रॅक्टरचालकाशेजारी बसलेली महिला व पुरुष खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला, … The post सातारा : ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरील दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

सातारा : ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरील दोघांचा मृत्यू

लिंब; पुढारी वृत्तसेवा : ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी लोणंदमध्ये ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने एकाला उडवले होते. यानंतर सोमवारी रात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे ट्रॅक्टरचालकाशेजारी बसलेली महिला व पुरुष खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर ट्रकचा क्लीनर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.
याबाबत माहीती अशी, उसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ऊस वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोमवारी रात्री 8 वाजता लिंब ता. सातारा परिसरातील कोलदरा नावाच्या भागातून पुण्याकडे निघालेल्या ट्रकने ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये ट्रॅक्टर चालकाशेजारी बसलेली एक महिला व एक पुरूष दोघेही रस्त्यावर खाली पडून ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली सापडले. यामध्ये पुरूष जागीच ठार झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. महिलेला उपचारासाठी दाखल केले असता तिचाही मृत्यू झाला. या अपघातात ट्रकचा क्लिनरदेखील जखमी झाला आहे. या घटनेनंतर ट्रक चालक मात्र पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस विभागाचे पोना सुशांत धुमाळ, हर्षद गालिंदे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी दाखल करून वाहतूक सुरळीत केली.
लिफ्ट मागणे पडले महागात
संबंधित ट्रॅक्टर हा प्रतापगड कारखान्याकडे निघाला होता. ट्रॅक्टरचा चालक व ठार झालेले दोघेही अनोळखी होते. त्या दोघांनी चालकाकडे लिफ्ट मागितल्यानंतर ते ट्रॅक्टरवर बसले होते. त्यामुळे त्यांची अधिक माहिती मिळू शकली नाही.

The post सातारा : ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरील दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

लिंब; पुढारी वृत्तसेवा : ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वी लोणंदमध्ये ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने एकाला उडवले होते. यानंतर सोमवारी रात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे ट्रॅक्टरचालकाशेजारी बसलेली महिला व पुरुष खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला, …

The post सातारा : ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरील दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source