सिक्सर किंग रोहित शर्माचा मोठा पराक्रम! ‘हा’ विक्रम मोडणे अशक्यच

सिक्सर किंग रोहित शर्माचा मोठा पराक्रम! ‘हा’ विक्रम मोडणे अशक्यच

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit WC Sixer King : भारतीय कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिटमॅनने हा विक्रम रचला. रोहितने आपल्या 50व्या षटकारासह वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले. वनडे वर्ल्ड कपमध्ये गेलच्या नावावर 49 षटकार आहेत.
षटकारांचे नाबाद अर्धशतक (Rohit WC Sixer King)
आता भारतीय कर्णधार रोहितने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय कर्णधाराने 4 चौकार आणि 4 षटकारांचा मदतीने 29 चेंडूत 162.07 च्या स्ट्राईक रेटने 47 धावा तडकावल्या. या 4 षटकारांसह हिटमॅनने विश्वचषक स्पर्धेत एकूण 51* षटकांरांचा टप्पा गाठला.
27 सामन्यांच्या 27 डावात ‘धमाका’ (Rohit WC Sixer King)
रोहित शर्माने 27 सामन्यांच्या 27 डावात 51 षटकार फटकावले आहेत. तर गेलने 35 सामन्यांच्या 34 डावांमध्ये 49 षटकार ठोकले आहेत. त्या खालोखाल ग्लेन मॅक्सवेल (25 सामन्यात 43 षटकार), एबी डिव्हिलियर्स (23 सामन्यात 37 षटकार) आणि डेव्हिड वॉर्नर (27 सामन्यात 37 षटकार), रिकी पाँटिंग (46 सामन्यात 31 षटकार), डेव्हिड मिलर (23 सामन्यात 30 षटकार) आणि ब्रेंडन मॅक्युलम (34 सामन्यात 29 षटकार) यांचा क्रमांक लागतो.
धावांच्या बाबतीतही रोहित गेलच्या पुढे…
षटकार मारण्यासोबतच धावा करण्याच्या बाबतीतही रोहित शर्मा ख्रिस गेलच्या पुढे आहे. हिटमॅनने 27 डावात 61.12 च्या सरासरीने 1528 धावा केल्या आहेत. तर ख्रिस गेलने 34 डावात 35.93 च्या स्ट्राईक रेटने 1186 धावा केल्या आहेत. या काळात भारतीय कर्णधाराने 6 अर्धशतके तर गेलने फक्त 2 अर्धशतके झळकावली आहेत.
रोहितची वनडेतील कामगिरी
23 जून 2007 रोजी आयर्लंड संघाविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रोहितने आतापर्यंत 260 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 252 डावांमध्ये 49.14 च्या सरासरीने आणि 91.63 च्या स्ट्राईक रेटने 10,615 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 55 अर्धशतकांसह 31 शतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 3 द्विशतकेही झळकावली आहेत.

ROHIT SHARMA becomes the first player to hit 5️⃣0️⃣ Sixes in ODI World Cup history ❤️ pic.twitter.com/iEOiLfKVPG
— Manojkumar (@Manojkumar_099) November 15, 2023

The post सिक्सर किंग रोहित शर्माचा मोठा पराक्रम! ‘हा’ विक्रम मोडणे अशक्यच appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit WC Sixer King : भारतीय कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिटमॅनने हा विक्रम रचला. रोहितने आपल्या 50व्या षटकारासह वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले. वनडे वर्ल्ड कपमध्ये गेलच्या नावावर 49 षटकार आहेत. …

The post सिक्सर किंग रोहित शर्माचा मोठा पराक्रम! ‘हा’ विक्रम मोडणे अशक्यच appeared first on पुढारी.

Go to Source