इंदापूर : बसमध्ये दागिने चोरी करणारी हरियाणाची टोळी गजाआड

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या हरियाणा राज्यातील आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८ लाखांचे १४ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, अशी माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दि. ५ डिसेंबर रोजी फिर्यादी अलका बबनराव खंडागळे (रा. कुर्डूवाडी, … The post इंदापूर : बसमध्ये दागिने चोरी करणारी हरियाणाची टोळी गजाआड appeared first on पुढारी.
#image_title

इंदापूर : बसमध्ये दागिने चोरी करणारी हरियाणाची टोळी गजाआड

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या हरियाणा राज्यातील आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८ लाखांचे १४ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, अशी माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दि. ५ डिसेंबर रोजी फिर्यादी अलका बबनराव खंडागळे (रा. कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) या त्यांच्या आईसह धाराशिव ते पुणे या बसमधून नातेवाईकांच्या लग्नासाठी इंदापूर तालुक्यातील डाळजपर्यंत प्रवास करीत होत्या. यावेळी अज्ञातांनी त्यांचे १४ तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते. याबाबतची तक्रार अलका खंडागळे यांनी इंदापूर पाेलिस ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी गुन्हे शोध पथकास सूचना दिल्या.
आरोपींबाबत काहीही पुरावा नसताना गुन्हे शोध पथकाने इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डूवाडी, चाकूर (जि. सोलापूर) शहरापर्यंतचे १०० पेक्षा अधिक सीसीटीव्हीचे फुटेज तपासून तांत्रिक माहितीवरून लातूर जिल्ह्यातील चाकूर रेल्वे स्टेशन येथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या हरियाणा राज्यातील आरोपी सतिशकुमार मनपुरसिंग (वय ४०, रा. वाॅर्ड नं. १४ बरवाला, जि. हिस्सार), राहुल धमेद्र (वय २३), सुभाष फुलला (वय ४६), विरेंद्रकुमार रामस्वरूप (वय ४०, तिघेही रा. धम्तानसाहेब ता. नरवाना, जि. जिद), शिशपाल पुरिराम (वय ६५, रा. बहुतवाला, ता. जि. जिंद) आणि राजेशकुमार पुर्ण सिंह (वय ३६, रा. हाउस नं. १३५, संदलाना, ता. बरवाला, जि. हिस्सार, राज्य हरियाणा) यांना अटक केली. त्यांनी चाकुर रेल्वेस्थानिक येथे लपवुन ठेवलेले फिर्यादी याचे अंदाजे ८ लाख रूपये किमतीचे दागिने पोलिसांना सुपूर्द केले.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे , उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रकाश पवार, प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, मोहन आनंदगावकर, निलेश फडणीस, दिनेश चोरमले, गणेश डेरे, गजानन वानूळे यांनी केली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे करित आहेत.
संशयितांनी विविध राज्यात केल्या चोऱ्या
संबंधित संशयित हे सराईत असून त्यानी यापूर्वी पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यामध्ये रेल्वे व बसमधील प्रवाशांचे दागिने, किमती वस्तू, रोख रक्कमेची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
The post इंदापूर : बसमध्ये दागिने चोरी करणारी हरियाणाची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या हरियाणा राज्यातील आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ८ लाखांचे १४ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत, अशी माहिती बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी दिली. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दि. ५ डिसेंबर रोजी फिर्यादी अलका बबनराव खंडागळे (रा. कुर्डूवाडी, …

The post इंदापूर : बसमध्ये दागिने चोरी करणारी हरियाणाची टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Go to Source