..त्या कारखान्याची अप्पर कामगार आयुक्तालयाकडेही नोंद नाही

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  तळवडे येथील कारखान्याला फायर एनओसी मिळाले नसल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता संबंधित कारखान्याची अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात नोंद आढळलेली नाही; तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची देखील त्यांनी परवानगी घेतली नसल्याची नवीन माहिती पुढे आली आहे. तळवडे येथील कारखान्याला आग लागल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 6 महिलांचा मृत्यू झाला. तर, दहा जण … The post ..त्या कारखान्याची अप्पर कामगार आयुक्तालयाकडेही नोंद नाही appeared first on पुढारी.
#image_title

..त्या कारखान्याची अप्पर कामगार आयुक्तालयाकडेही नोंद नाही

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  तळवडे येथील कारखान्याला फायर एनओसी मिळाले नसल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता संबंधित कारखान्याची अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात नोंद आढळलेली नाही; तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची देखील त्यांनी परवानगी घेतली नसल्याची नवीन माहिती पुढे आली आहे. तळवडे येथील कारखान्याला आग लागल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 6 महिलांचा मृत्यू झाला. तर, दहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, यामध्ये मृतांचा आकडा वाढत आहे.
या घटनेनंतर या कारखान्याबाबत नव-नवी माहिती पुढे येऊ लागली आहे. मुळात हा कारखाना रेडझोन क्षेत्रात असल्याने तेथे बांधकामांना परवानगी मिळत नाही. कारखान्यासाठी फायर एनओसी घेण्यात आलेली नव्हती. त्या पाठोपाठ आता या कारखान्याची पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त कार्यालय, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे देखील नोंद नसल्याची नवी माहिती पुढे आली आहे. या कारखान्याची नोंदच नसल्याने त्यावर कोणत्याही संस्थेचे नियंत्रण नव्हते. याबाबत रविवारी (दि. 10) दैनिक पुढारीला माहिती देताना कामगार उपायुक्त अभय गिते म्हणाले की, तळवडे येथील कारखान्याच्या ठिकाणी भेट दिली. हा कारखाना रेडझोन क्षेत्रात होता. संबंधित कारखान्याची कामगार विभागाकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी केल्याचे आढळलेले नाही. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत कारखान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियंत्रण ठेवण्यात येते.

तळवडेतील दुर्घटनाग्रस्त कारखाना हा विनापरवाना सुरु होता. या कारखान्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची परवानगी घेतलेली नव्हती. दरम्यान, याबाबत काही तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. तसेच, त्यानुसार आवश्यक कारवाई सुरु करण्यात आली आहे.
            – एस. जी. गिरी, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय.
कामगारांच्या वारसांना मिळणार नुकसानभरपाई
तळवडेतील कारखान्यात लागलेल्या आगीत मृत झालेल्या कामगारांच्या वारसांना कामगार कायद्यानुसार नुकसानभरपाई मिळायला हवी. त्यासाठी नुकसानभरपाई आयुक्तांना मृत आणि जखमी कामगारांविषयीची माहिती पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, विविध कामगार कायद्यांतर्गत संबंधित आस्थापना मालकावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त अभय गिते यांनी दिली.
The post ..त्या कारखान्याची अप्पर कामगार आयुक्तालयाकडेही नोंद नाही appeared first on पुढारी.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  तळवडे येथील कारखान्याला फायर एनओसी मिळाले नसल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता संबंधित कारखान्याची अप्पर कामगार आयुक्त कार्यालयात नोंद आढळलेली नाही; तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची देखील त्यांनी परवानगी घेतली नसल्याची नवीन माहिती पुढे आली आहे. तळवडे येथील कारखान्याला आग लागल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 6 महिलांचा मृत्यू झाला. तर, दहा जण …

The post ..त्या कारखान्याची अप्पर कामगार आयुक्तालयाकडेही नोंद नाही appeared first on पुढारी.

Go to Source