चंद्रपूर: ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेला शानदार सुरूवात
चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे दुस-या महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन पार पडले. ही स्पर्धा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने होत आहे. 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणात याच काळात होत आहे. Maharashtra Kesari
दुहेरी महाराष्ट्र केसरी विजेते शिवराज राक्षे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. स्पर्धेच्या आधी शहरातून निघालेल्या कुस्तीपटूंच्या रॅलीने ब्रम्हपुरी शहर दुमदुमून गेले. राज्यभरातील 600 महिला कुस्तीपटुंचा स्पर्धेत सहभाग असून विजेत्यांना लाखोंची बक्षीसे दिली जाणार आहेत. 3 दिवस ही स्पर्धा चालणार असून शिक्षण नगरी अशी ओळख असलेल्या ब्रम्हपुरी शहरात क्रीडा नैपुण्य वाढ व विशेषतः कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. पुढील वर्षी पुरुष महाराष्ट्र केसरी स्पर्धा देखील ब्रह्मपुरी शहरात आयोजित करण्याचा मानस असल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितला. Maharashtra Kesari
हेही वाचा
चंद्रपूर : वरोरा तालुक्यात आढळला वाघिणीचा मृतदेह
जत : वाळेखिंडीत चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न
गोपीचंद पडळकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
The post चंद्रपूर: ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेला शानदार सुरूवात appeared first on पुढारी.
चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे दुस-या महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन पार पडले. ही स्पर्धा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने होत आहे. 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणात याच काळात होत आहे. Maharashtra Kesari दुहेरी महाराष्ट्र …
The post चंद्रपूर: ब्रम्हपुरी येथे महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेला शानदार सुरूवात appeared first on पुढारी.