पिग्मेंटेशन आणि उपचार

बर्‍याचदा पुरळ येऊन गेल्यानंतर आपल्या त्वचेवर काळे डाग दिसतात. यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात. त्वचेच्या पेशी मेलॅनिनचे जास्त उत्पादन करतात तेव्हा हायपरपिग्मेंटेशन होते. मेलॅनिन हा पदार्थ आपल्या त्वचेला रंग देतो. पिग्मेंटेशन अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे की, – अ‍ॅलर्जी, मुरूम, फोड आणि दुखापतींमुळे त्वचेचे नुकसान. – सूर्यप्रकाश. – अनुवांशिकता हेदेखील यामागचे कारण ठरू शकते. पिग्मेंटेशनसाठी 125 … The post पिग्मेंटेशन आणि उपचार appeared first on पुढारी.
#image_title

पिग्मेंटेशन आणि उपचार

डॉ. रिंकी कपूर

बर्‍याचदा पुरळ येऊन गेल्यानंतर आपल्या त्वचेवर काळे डाग दिसतात. यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात. त्वचेच्या पेशी मेलॅनिनचे जास्त उत्पादन करतात तेव्हा हायपरपिग्मेंटेशन होते. मेलॅनिन हा पदार्थ आपल्या त्वचेला रंग देतो.
पिग्मेंटेशन अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे की,
– अ‍ॅलर्जी, मुरूम, फोड आणि दुखापतींमुळे त्वचेचे नुकसान.
– सूर्यप्रकाश.
– अनुवांशिकता हेदेखील यामागचे कारण ठरू शकते. पिग्मेंटेशनसाठी 125 हून अधिक जीन्स जबाबदार आहेत.
संबंधित बातम्या 

स्वादुपिंडावरील सूज कशामुळे? जाणून घ्या लक्षणे आणि उपचार
Phobias and Treatment: मुलांमधील फोबिया आणि आयुर्वेदिक उपचार
Cancer : कर्करोगावरील उपचारात रुद्राक्ष ठरू शकतात गुणकारी

कारण
– वरच्या थरामध्ये दिसणारे रंगद्रव्य जे सूर्यामुळे होणारे नुकसान आणि असुरक्षित सन टॅनमुळे होते.
– अनेकदा कपड्यांच्या घर्षणामुळे होते.
– डीप पिग्मेंटेशन जसे की मेलाझ्मा, डीप सन टॅन, हायपरपिग्मेंटेशन इ. या प्रकारावर उपचार करणे सर्वात कठीण आहे.
हायपरपिग्मेंटेशनची सामान्य कारणे
बर्थमार्क जे शरीरात कुठेही असू शकतात. सनस्पॉटस् / एज स्पॉटस् ज्याला लिव्हर स्पॉटस्देखील म्हणतात, ते ठरावीक कालावधीत सूर्याच्या संपर्कात आल्याने असतात. ते चेहरा, हात आणि पाय यासारख्या सूर्यप्रकाशाच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या भागांवर परिणाम करतात.
गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल किंवा मेलास्मा ज्यामुळे कपाळावर, चेहर्‍यावर आणि पोटावरील त्वचेवर काळ्या रंगाचे मोठे ठिपके दिसतात.
प्रतिजैविकांचे सेवन तसेच गर्भ निरोधक गोळ्यांचा वापर.
– हायपोपिग्मेंटेशन ज्यामुळे मेलॅनिनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे त्वचेवर पांढरे किंवा निस्तेज असे ठिपके दिसतात. जखम, फोड, अल्सर, संक्रमण, बर्न्स किंवा सोरायसिस आणि एक्झिमा ज्यामुळे त्वचेवर जळजळ होते.
डिपिग्मेंटेशन
या प्रकारात त्वचेचे रंगद्रव्य कमी होते आणि ते पांढरे होते. याचे सर्वात सामान्य कारण त्वचारोग आहे.
उपचार
तोंडावाटे घेण्यात येणारी औषधे यामध्ये अँटिऑक्सिडंट टेबल्सचा समावेश आहे, जे त्वचेला रंग उजळ करण्यास आणि गडद ठिपके कमी करण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन केले पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे चेहर्‍यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा जे त्वचेला सूर्यप्रकाशापासून, विशेषतः उघड्या भागांचे संरक्षण करण्यास मदत करते. ओरल ग्लुटाथिओन आणि व्हिटॅमिन सी ही हायपरपिग्मेंटेशनसाठी इतर काही प्रभावी औषधे आहेत.
क्रीमचा वापर
– त्वचा उजळ करणारे क्रीम्स ज्यामध्ये हायड्रोक्विनोन, लिकोरिस एक्स्ट्रॅक्ट, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी, मँडेलिक अ‍ॅसिड, ग्लायकोलिक अ‍ॅसिड, फेरुलिक अ‍ॅसिड, कोजिक अ‍ॅसिड आणि अ‍ॅझेलेक अ‍ॅसिड यासारखे घटक असतात, जे काळे डाग कमी करण्यास मदत करतात. ही क्रीम दिवसातून दोनदा लावता येऊ शकते आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसून येतात.
– रेटिनॉइडस् जे व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्वचेच्या आतील रंगद्रव्यांवर उपचार करते. ते गडद त्वचेवर सर्वात प्रभावी आहेत.
– सनस्क्रीन : हे दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग असावा. सनस्क्रीनमध्ये सक्रिय घटक असतात जे त्वचेला सूर्यापासून
होणारे नुकसान आणि पिग्मेंटेशनपासून संरक्षण करण्यास मदत करतात. बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी सनस्क्रीनचा वापर करा आणि दर 3-4 तासांनी पुन्हा लावावे.
The post पिग्मेंटेशन आणि उपचार appeared first on पुढारी.

बर्‍याचदा पुरळ येऊन गेल्यानंतर आपल्या त्वचेवर काळे डाग दिसतात. यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात. त्वचेच्या पेशी मेलॅनिनचे जास्त उत्पादन करतात तेव्हा हायपरपिग्मेंटेशन होते. मेलॅनिन हा पदार्थ आपल्या त्वचेला रंग देतो. पिग्मेंटेशन अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे की, – अ‍ॅलर्जी, मुरूम, फोड आणि दुखापतींमुळे त्वचेचे नुकसान. – सूर्यप्रकाश. – अनुवांशिकता हेदेखील यामागचे कारण ठरू शकते. पिग्मेंटेशनसाठी 125 …

The post पिग्मेंटेशन आणि उपचार appeared first on पुढारी.

Go to Source