पुढारी ऑनलाईन डेस्क : कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालायाच्या निर्णयाचे स्वागत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र मतदानापूर्वी देशभर पसरलेले काश्मीरी पंडित पुन्हा आपल्या घरी परतून खुल्या वातावरणात मतदान करतील याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मादी घेणार का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१९ ला कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने पाठींबा दिला होता. आजही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. न्यायालयाने सप्टेंबर पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुका लवकरात लवकर होतील आणि जनतेला मतदानाचा अधिकार मिळेल. मात्र निवडणुकीपूर्वी पाकव्याप्त काश्मीर आपण घेतला तर संपूर्ण काश्मीरमध्ये निवडणुका होतील आणि याचा देशवासीयांना अभिमान वाटेल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
पण निवडणुकीत मतदान करण्यासाठी घर सोडून देशभर पसरलेले काश्मीरी पंडित पुन्हा घरी परतणार का? आणि खुल्या वातावरणात मतदान करणार का? याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार का? असे सवाल ठाकरे यांनी केले आहेत.
परिस्थितीमुळे घर सोडून गेलेले काश्मिरी पंडीत निवडणूकांपूर्वी पुन्हा सगळेच्या सगळे काश्मिरमध्ये परत येतील ह्याची गॅरंटी कोण देईल? पंतप्रधान ह्याची गॅरंटी देतील?
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 11, 2023
न्यायालयानं सप्टेंबरपर्यंत निवडणूका घ्यायला सांगितल्यात. त्या निवडणूका घेण्यापूर्वी जर का पाकव्याप्त काश्मिर घेऊ शकलो, तर संपूर्ण काश्मिरमध्ये एकत्र निवडणूका झाल्यास देशवासियांना आनंद होईल.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 11, 2023
हेही वाचा :
“अखंड भारत…” : कलम ३७० रद्द निकालाबाबत PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका सप्टेंबर २०२४ पर्यंत घ्या : सर्वोच्च न्यायालय
कलम ३७० रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
The post ‘३७० रद्द’ निर्णयाचे स्वागतच पण…; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठाकरेंची प्रतिक्रिया appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : कलम ३७० बाबत सर्वोच्च न्यायालायाच्या निर्णयाचे स्वागत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र मतदानापूर्वी देशभर पसरलेले काश्मीरी पंडित पुन्हा आपल्या घरी परतून खुल्या वातावरणात मतदान करतील याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मादी घेणार का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विधीमंडळाच्या कामकाजात …
The post ‘३७० रद्द’ निर्णयाचे स्वागतच पण…; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठाकरेंची प्रतिक्रिया appeared first on पुढारी.