Market Update : कोबी, फ्लॉवरच्या भावात स्वस्ताई
शंकर कवडे
पुणे : ढगाळ वातावरणामुळे पोषक वातावरण तयार होऊन उत्पादनात वाढ झाल्याने पुणे कृषी उत्पन्न समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात कोबी व फ्लॉवरची आवक वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कोबीसह फ्लॉवरच्या दहा किलोला 60 ते 80 रुपये, तर किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
रविवारी (दि. 10) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांच्या आवकेत दहा ट्रकने वाढ झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने भेंडी, गवार, ढोबळी मिरची व घेवड्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. अन्य सर्व फळभाज्यांची आवक जावक कायम राहिल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते.
परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे 10 ते 12 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 11 ते 12 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, भुईमुग शेंग कर्नाटक येथून 1 टेम्पो, मध्य प्रदेश व पंजाब येथून 26 ते 27 ट्रक मटार, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 आणि कैरी 700 ते 800 गोणी, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे 4 ते 5 टेम्पो आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, टोमॅटो सुमारे अकरा ते बारा हजार क्रेट्स, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, पावटा 4 ते 5 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा जूना आणि नवीन सुमारे 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 30 ते 35 टेम्पो आवक झाली.
हेही वाचा :
Karnataka Congress Split : कर्नाटक काँग्रेसमध्ये पडणार फूट ; माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचा दावा
कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार मैदानात, चांदवडला रास्तारोकोत सहभागी
The post Market Update : कोबी, फ्लॉवरच्या भावात स्वस्ताई appeared first on पुढारी.
पुणे : ढगाळ वातावरणामुळे पोषक वातावरण तयार होऊन उत्पादनात वाढ झाल्याने पुणे कृषी उत्पन्न समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात कोबी व फ्लॉवरची आवक वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कोबीसह फ्लॉवरच्या दहा किलोला 60 ते 80 रुपये, तर किरकोळ बाजारात 50 …
The post Market Update : कोबी, फ्लॉवरच्या भावात स्वस्ताई appeared first on पुढारी.