कर्नाटक काँग्रेसमध्ये पडणार फूट ; माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचा दावा
पुढारी ऑनलाईन डेस्क: कर्नाटक काँग्रेस सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही. कर्नाटक काँग्रेसमधील एक दिग्गज नेता ५० ते ६० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करु शकतो. त्यामुळे कोणत्याही क्षणी कर्नाटक काँग्रेस फुटू शकते, असा खळबळजनक दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. (Karnataka Congress Split)
रविवारी (दि.११) माध्यमांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, “कर्नाटक काँग्रेसमधील एक प्रभावी मंत्री आणि नेता केंद्र सरकारने त्यांच्यावर दाखल केलेल्या खटल्यापासून वाचण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करु शकताे. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये काेणत्याही क्षणी फूट पडू शकते.” (Karnataka Congress Split)
Karnataka Congress Split: कर्नाटक सरकारमधील मंत्री पक्ष सोडणार
कुमारस्वामी म्हणाले, संबंधित मंत्र्यावर केंद्राने सुरू केलेल्या कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी सत्ताधारी काँग्रेसमधील एक प्रभावशाली मंत्री नेता भाजपमध्ये जाण्याचा विचार करत आहे. दरम्यान, तो ५० ते ६० आमदारांसह मंत्री काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करू शकताे. यासाठी संबंधित नेत्याची भाजप नेत्यांशी चर्चा सुरू आहे, असा दावाही कुमारस्वामी यांनी केला आहे.
कर्नाटक काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक नाही
जेडीएस नेत्याने पत्रकारांना सांगितले की, कर्नाटक काँग्रेस सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही. हे सरकार कधी पडेल हे त्यांना माहीत नाही. एक मंत्री आपल्यावर केंद्राने दाखल झालेल्या गुन्ह्यातून सुटण्यासाठी हतबल झाला आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी तो भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतो.
हा कोणी छोटा नेता नाही, कधीही काहीही होऊ शकते
कुमारस्वामी पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने त्यांच्याविरुद्ध असे खटले दाखल केले आहेत, ज्यातून सुटण्याची शक्यता नाही. पत्रकारांनी संबंधित नेत्याचे नाव विचारले असता छोट्या नेत्यांकडून अशा पावलांची अपेक्षा करता येणार नाही. हे फक्त प्रभावशाली लोकच करू शकतात. महाराष्ट्रासारखे कर्नाटकात देखील होऊ शकते. कर्नाटकातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता काहीही होऊ शकते, असेही कुमारस्वामी म्हणाले.
हेही वाचा:
Article370 : जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था
Vision India@2047 : पंतप्रधान मोदी आज सादर करणार भारताच्या भविष्याचा रोडमॅप
‘आग्र्याहून सुटका’ स्मृतिदिनानिमित्त पालखी प्रस्थान सोहळा उत्साहात
The post कर्नाटक काँग्रेसमध्ये पडणार फूट ; माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचा दावा appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: कर्नाटक काँग्रेस सरकारमध्ये सर्व काही ठीक नाही. कर्नाटक काँग्रेसमधील एक दिग्गज नेता ५० ते ६० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करु शकतो. त्यामुळे कोणत्याही क्षणी कर्नाटक काँग्रेस फुटू शकते, असा खळबळजनक दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (सेक्युलर) नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे. (Karnataka Congress Split) रविवारी (दि.११) माध्यमांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले …
The post कर्नाटक काँग्रेसमध्ये पडणार फूट ; माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींचा दावा appeared first on पुढारी.