नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार

नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार

देवळा ; पुढारी वृत्‍तसेवा लोहोणेर येथील गिरणा नदी पुलावर (मंगळवार) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान दोन कार आणि दोन दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. स्कुटीवरील चालक कळवण येथील सागर देवरे हे यामध्ये जागीच ठार झाले. ठेंगोडा ता. बागलाण येथील माहेर असलेली सागर देवरे यांची पत्नी कावेरी देवरे या जखमी झाल्‍याने त्‍यांना सटाणा येथील खासगी दवाखाण्यात उपचार केल्या नंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त दुचाकीवरील व्यक्तीचा तपास लागला असून, अपघातग्रस्त डिस्कवर मोटरसायकल व कार मधील व्यक्तीचा तपास लागलेला नाही. देवळा पोलीस या अपघाताबाबत पुढील तपास करीत आहेत. अपघातामुळे गिरणा नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्‍त्‍यावरून बाजुला करत वाहतूक सुरळीत चालू केली. याबाबत देवळा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, एपीआय दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
हेही वाचा :

Maharashtra Kesari : धाराशिव येथे गुरूवारपासून पहिल्यांदाच रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’चा फड 
PM Kisan Nidhi Yojana | शेतकऱ्यांची दिवाळी गोड; पीएम किसानचा १५ वा हप्ता खात्यात जमा

“इंझमामचे मानसिक संतुलन बिघडलय..” : धर्मांतर टिप्‍पणीवर हरभजन सिंगने फटकारले

The post नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार appeared first on पुढारी.

देवळा ; पुढारी वृत्‍तसेवा लोहोणेर येथील गिरणा नदी पुलावर (मंगळवार) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान दोन कार आणि दोन दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. स्कुटीवरील चालक कळवण येथील सागर देवरे हे यामध्ये जागीच ठार झाले. ठेंगोडा ता. बागलाण येथील माहेर असलेली सागर देवरे यांची पत्नी कावेरी देवरे या जखमी झाल्‍याने त्‍यांना सटाणा येथील खासगी …

The post नाशिक : २ कार आणि २ दुचाकींचा विचित्र अपघात; एकजण ठार appeared first on पुढारी.

Go to Source