मनसेचे रेल रोको आंदोलन पोलिसांनी रोखले

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथील मनसेकडून नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस नाशिककरांना पुन्हा मिळावी व पंचवटी एक्स्प्रेस जालन्यापर्यंत घेऊन जाण्याच्या निषेधार्थ तसेच गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलनात मुंबईहून येणारी भागलपूर एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना अडवले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकाबाहेर येऊन निदर्शने केली. रेल्वे प्रशासनाने आंदोलनाचा धसका घेत आंदोलनाआधी मनसेचे … The post मनसेचे रेल रोको आंदोलन पोलिसांनी रोखले appeared first on पुढारी.
#image_title

मनसेचे रेल रोको आंदोलन पोलिसांनी रोखले

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथील मनसेकडून नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस नाशिककरांना पुन्हा मिळावी व पंचवटी एक्स्प्रेस जालन्यापर्यंत घेऊन जाण्याच्या निषेधार्थ तसेच गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलनात मुंबईहून येणारी भागलपूर एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना अडवले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकाबाहेर येऊन निदर्शने केली.
रेल्वे प्रशासनाने आंदोलनाचा धसका घेत आंदोलनाआधी मनसेचे शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित यांना रेल्वे पोलिसांनी सी.आर. पीसी कलम १४९ अंतर्गत आंदोलनासंदर्भात नोटीस दिली होती. आंदोलनावेळी शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित, विभागाध्यक्ष साहेबराव खर्जुल, उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी, उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुने, भानुमती अहिरे, रोहन देशपांडे, रंजन पगारे, वाहतूक सेनेचे मयूर कुकडे, आदित्य कुलकर्णी, विल्सन साळवी, चंद्रभान ताजनपुरे, दीपक बोराडे, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
नाशिककरांच्या सोयीची नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस ही ऐन दिवाळीमध्ये मार्ग बदलून ही गाडी आता नाशिकला न येता, अमरावतीहून निघून भुसावळ मनमाडमार्गे कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंडमार्गे पुण्यापर्यंत धावत आहे. या संदर्भात मनसेचे शहर संघटक अ‍ॅड. पंडित यांनी ०५/११/२०२३ रोजी रेल्वेस्थानक प्रबंधक कुठार यांना निवेदन दिले होते. त्यात नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी अन्यथा रेल रोकोचा इशारा दिला होता. परंतु रेल्वे प्रशासन जागे झाले नाही व रेल्वे प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. मनसेने १८/११/२०२३ रोजी शेवटची संधी म्हणून पुन्हा निवेदन दिले. मात्र तरीही रेल्वे प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही. याहून कहर म्हणजे पंचवटी एक्स्प्रेस जालन्यापर्यंत घेऊन जाण्याचा घाट आता रेल्वे प्रशासन घालत असल्याचे वृत्त आहे.
नाशिकचे सत्ताधारी पक्षातले आमदार व खासदार या प्रश्नावर मूग गिळून गप्प का आहेत? त्यांना नाशिककरांच्या समस्या दिसत नाहीत का? असा प्रश्न मनसेचे शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित यांनी आंदोलनादरम्यान विचारला. मनसे नाशिकरोडकडून रविवारी (दि. 10) सकाळी ११ वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकात मुंबईहून येणारी भागलपूर एक्स्प्रेस रोखून रेल रोकोचा प्रयत्न केला. नाशिकरोड रेल्वेस्थानक उपप्रबंधक प्रकाश मरसाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
हेही वाचा :

Article370 : जम्मू – काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था
श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे : स्वामी गोविंददेव गिरी महाराज
 

The post मनसेचे रेल रोको आंदोलन पोलिसांनी रोखले appeared first on पुढारी.

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथील मनसेकडून नाशिक-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस नाशिककरांना पुन्हा मिळावी व पंचवटी एक्स्प्रेस जालन्यापर्यंत घेऊन जाण्याच्या निषेधार्थ तसेच गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल रोको आंदोलनात मुंबईहून येणारी भागलपूर एक्स्प्रेस रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु रेल्वे पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना अडवले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकाबाहेर येऊन निदर्शने केली. रेल्वे प्रशासनाने आंदोलनाचा धसका घेत आंदोलनाआधी मनसेचे …

The post मनसेचे रेल रोको आंदोलन पोलिसांनी रोखले appeared first on पुढारी.

Go to Source